esakal | 88 व्या वर्षी का केली राजकारणात एंट्री? मेट्रोमॅन ई. श्रीधरन यांनी स्वत:च केला खुलासा

बोलून बातमी शोधा

E Shridharan}

ते केरळमधील मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील असं देखील केरळ भाजपकडून जाहीर करण्यात आलं होतं.

desh
88 व्या वर्षी का केली राजकारणात एंट्री? मेट्रोमॅन ई. श्रीधरन यांनी स्वत:च केला खुलासा
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : मेट्रोमॅन नावाने प्रसिद्ध असणाऱ्या ई. श्रीधरन यांनी गेल्या रविवारी केरळमध्ये आयोजित केलेल्या एका सभेला संबोधित करताना त्यांनी राजकारणात प्रवेश करण्यामागचं कारण उलगडून सांगितलं आहे. तसेच भाजपकडून दिली जाणारी कोणत्याही प्रकारची जबाबदारी सांभाळण्यासाठी ते तयार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. अलिकडेच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन 88 व्या वर्षी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरवात केली आहे. ते केरळमधील मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील असं देखील केरळ भाजपकडून जाहीर करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर काही तासांनीच या घोषणेवरुन घुमजाव करण्यात आला होता. 

हेही वाचा - मोदींपेक्षा राहुल गांधीच पंतप्रधानपदी योग्य; निवडणूकपूर्व सर्व्हेत दक्षिणेतील राज्याची इच्छा

केरळमधील शणमुगममधील सभेवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित होते. या सभेत ते म्हणाले की, ते आपल्या उर्जेचा वापर केरळसाठी करु इच्छित आहेत. गेल्या 67 वर्षांमध्ये मी सरकारी नोकर होतो. अनेक लोक मला विचारतात की, एवढ्या वर्षांनंतर मी राजकारणात का आलो? 67 वर्षांपर्यंत मी देशाच्या अनेक प्रकल्पांमध्ये काम केलं आहे.

याआधी 4 मार्चला त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की, शारीरिक वयापेक्षा मानसिक वय आपल्याला सांगतं की आपल्याला कोणती जबाबदारी घेतली पाहिजे. मानसिकदृष्ट्या मी खूपच ऍक्टीव्ह आणि तरुण आहे. आतापर्यंत मला आरोग्याच्या दृष्टीने कसल्याही प्रकारची समस्या नाहीये. मला वाटत नाही की आरोग्य हा काही मुद्दा आहे. मी एक सामान्य राजकारणी म्हणून काम करणार नाहीये तर एक टेक्नोक्रॅटच्या पद्धतीने मी काम करणे सुरु ठेवेन. राज्यात सहा एप्रिल रोजी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधी कसारगोड ते तिरुवनंतपुरमपर्यंत केरळचे भाजप प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांच्याकडून काढलेल्या विजय यात्रेच्या समारोपावेळी श्रीधरन यांनी म्हटलं की, मी अजूनही उर्जावान आहे. तसेच आपल्या उर्जेचा वापर केरळसाठी करु इच्छित आहे. मला जी कुठली जबाबदारी दिली जाईल, ती मी पूर्ण उत्साहाने तसेच ताकदीनिशी पार पाडेन, असं त्यांनी म्हटलं.