

Mewar Royal Family Faces Major Property Dispute
Esakal
महाराणा प्रताप यांचे वंशज असलेल्या मेवाडच्या राजघराण्यात आता वारसाहक्काची लढाई सुरू आहे. यावरून वारसांनी थेट कोर्टात धाव घेतली आहे. महाराणा अरविंदसिंह मेवाड यांचं १६ मार्च २०२५ ला निधन झालं. निधनाच्या महिन्याभरापूर्वीच त्यांनी मृत्यूपत्र करून मालमत्ता मुलगा लक्ष्यराजसिंह यांच्या नावावर केली. पण आता याला अरविंदसिंह मेवाड यांच्या मुलींनी आव्हान दिलं आहे. वडील मद्यपानाच्या आहारी गेले होते आणि ते निर्णय घेण्याच्या मानसिकतेत नव्हते असा दावा मुलींनी केलाय.