
UAE राष्ट्राध्यक्षांच्या निधनामुळं भारतात आज राष्ट्रीय दुखवटा
नवी दिल्ली : UAE राष्ट्राध्यक्ष शेख खलिफा बिन झायेद अल नहायन यांचं शुक्रवारी निधन झालं. यामुळं त्यांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी भारतात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्याचा निर्णय भारत सरकारनं घेतला आहे. यासाठी आज देशभरात राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात येणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयानं जाहीर केलं आहे. (MHA declaired National mourning in India tomorrow over death of UAE President)
राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात येणार असल्यानं आज ज्या इमारतींवर दररोज राष्ट्रध्वज फडकवले जातात त्या सर्व सरकारी आणि खासगी इमारतींवर अर्ध्यावर राष्ट्रध्वज फडकतील. तसेच दुखवटा पाळण्यात येणार असल्यानं कोणत्याही स्वरुपाचे सरकारी मनोरंजनाचे कार्यक्रम होणार नाहीत, असं गृहमंत्रालयानं आपल्या आदेशात म्हटलं आहे.
हेही वाचा: मदरशांमध्ये राष्ट्रगीत गायनावर ओवैसींचं भाष्य; म्हणाले, आम्हाला..
संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) राष्ट्राध्यक्ष शेख खलिफा हे 73 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबद्दल युएई सरकारनं 40 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. याशिवाय देशातील सर्व खासगी आणि सरकारी क्षेत्रात तीन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आला आहे. खलिफा यांनी 3 नोव्हेंबर 2004 रोजी देशाचे राष्ट्राध्यक्ष आणि अबूधाबीचे शासक म्हणून पदभार स्वीकारला होता. त्याआधी त्यांचे वडील शेख झायेद बिन सुलतान अल नाहयान हे युएईचे राष्ट्राध्यक्ष होते. 1971 ते 2004 पर्यंत ते देशाचे प्रमुख होते. 1948 मध्ये जन्मलेले शेख खलिफा हे UAE चे दुसरे राष्ट्रपती आणि अबूधाबीचे 16 वे शासक होते. आपल्या कार्यकाळात, शेख खलिफा यांनी UAE आणि अबूधाबीच्या प्रशासनाची पुनर्रचना करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि अनेक सुधारणा अंमलात आणल्या.
Web Title: Mha Declaired National Mourning In India Tomorrow Over Death Of Uae President
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..