
मदरशांमध्ये राष्ट्रगीत गायनावर ओवैसींचं भाष्य; म्हणाले, आम्हाला..
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश सरकारने मदरशांमध्ये राष्ट्रगीत गाणं बंधनकारक केलं आहे. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारनेही असाच निर्णय घ्यावा, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे. एबीपी न्यूजच्या मुलाखतीत ते बोलत होते. (Asduddin Owaisi reaction on national anthem singing in madrassas)
हेही वाचा: धार्मिक स्थळं 'जैसे थे' ठेवण्याच्या कायद्याचा भंग होतोय: ओवैसी
ओवैसी म्हणाले, "सन 2016 मध्येच सरकारी शाळांमध्ये राष्ट्रगीत गाण्याचे आदेश निघाले आहेत. त्यामुळं उत्तर प्रदेश सरकारला असा नवा आदेश काढण्याची गरज नव्हती. पण मदरशांचं देशावर प्रेम नसल्याचं दाखवायचं असल्यानं ते असे निर्णय घेत आहेत"
हेही वाचा: धमकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ
भाजप आणि आरएसएसला मी सांगू इच्छितो की देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात तुमचं कोणीही नव्हतं. ज्या प्रकारे मदरशांवर तुम्ही देशाप्रती प्रेम नसल्याचं दाखवू इच्छिता, अशाच मदरशांमधील अनेक मुस्लिमांनी देशाच्या स्वातंत्र्यात भाग घेतला होता. या मदरशांनी इंग्रजांविरोधात फतवा काढला होता आणि त्यासाठी अनेक मुस्लिमांनी आपले प्राणही गमावले, अशा शब्दांत ओवैसींनी भाजपवर टीका केली.
राष्ट्रगीताचा आम्हाला अभिमान
देशाचं राष्ट्रगीत अर्थात जन-गन-मनचा आम्हाला अभिमान आहे. पण ते गाण्यासाठी कोणाला जबरदस्ती करण्याची गरज नाही, असंही यावेळी असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं आहे.
Web Title: Asduddin Owaisi Reaction On National Anthem Singing In Madrassas
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..