धक्कादायक; MIचे 15 कोटी रुपयांचे मोबाईल लंपास, दरोडेखोरांचा ट्रकवरच डल्ला

thief
thief

चेन्नई- नवरात्र असल्याने लोकांमध्ये उत्सावाचे वातावरण आहे. अशात चोरांनी आपल्या हालचाली वाढवल्याचं दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी चोरट्यांनी बँकेतून 7 लाखांची रोकड लुटली होती. त्यानंतर आणखी एक मोठी घटना तामिळनाडूमध्ये घडली आहे. चोरट्यांनी MI कंपनीचे मोबाईल घेऊन जाणारा ट्रक लुटला आहे. काही अज्ञात दरोडेखोरांनी मोबाईल घेऊन जाणाऱ्या ट्रकवर हल्ला केला आणि त्यातील महागडे मोबाईल लुटले. 

द हिंदू या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, ट्रकमध्ये 15 कार्टन्स होते. एका कार्टनमध्ये 960 मोबाईल होते. त्यामुळे दरोडेखोरांनी तब्बल 14 हजार 500 मोबाईल लंपास केले आहेत. चोरी गेलेल्या मोबाईलची एकूण किंमत 15 कोटी असल्याचे सांगितले जात आहे. दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात ट्रक चालक आणि त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला आहे. दरोडेखोरांनी ट्रकमधील कार्टन्स लुटले आणि तेथून पळ काढला. 

US Election: 'ट्रम्प vs बायडेन'  कोण ठरलं वरचढ? वाचा डिबेटमधील...

MI कंपनीचे मोबाईल घेऊन ट्रक तामिळनाडूतील श्रीपेरमदूर औद्योगिक वसाहतीकडे जात होता. शूलगिरी येथे रात्री दोनच्या सुमारास काही चोरांनी ट्रकला अडवले. यावेळी ट्रक चालक आणि चोरांमध्ये बाचाबाची झाली. ट्रक लुटण्याच्या इराद्याने आलेल्या चोरांनी ट्रक चालकाला आणि त्याच्या सहकार्याला जबर मारहाण केली. याते ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर ट्रकमधील कार्टन घेऊन चोर पसार झाले. पेट्रोलिंगसाठी आलेल्या पोलिसांना ट्रक चालक अरुण आणि कुमार जखमी अवस्थेत सापडले. दोघांनी घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.

अशाच प्रकारच्या घटना या भागात घडत असल्याचे सांगितले जात आहे. नेल्लोर, चित्तोड, गुटुंर, वारंगल जिल्ह्यात अशाच घटना समोर आल्या आहेत. चोर नियोजनबद्ध पद्धतीने ट्रक चालकांना अडवून त्यांच्यावर हल्ला करत आहेत. त्यानंतर ते ट्रक लुटत आहेत. विशेष म्हणजे MI कंपनीकडून या प्रकरणी कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.  ट्रक चालक अरुणने पोलिसांकडे केवळ फिर्याद दिली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com