Religious Sentiments Clash : शाळेच्या मध्यान्ह भोजनात अंडे देण्यावरून नाराज झालेल्या ७० पालकांनी त्यांच्या मुलांना शाळेतून काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कर्नाटकच्या मंड्या तालुक्यातील अलाकोरे गावातील सरकारी शाळेत ही घटना घडली. त्यानंतर आता सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. शाळा प्रशासनानेही यावर नाराजी व्यक्त केली आहे.