esakal | Video : मिकाला हवा पाकच्या मुलीचा मुका...
sakal

बोलून बातमी शोधा

Mika Singh performance at wedding in Karachi sparks outrage

भारतीय गायक मिक सिंग याला आता पाकिस्तानी मुलीचा मुका हवा आहे का?

Video : मिकाला हवा पाकच्या मुलीचा मुका...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्लीः भारतीय गायक मिक सिंग याने पाकिस्तानमध्येजाऊन एका अब्जाधीशाच्या मुलीच्या विवाहसमारंभादरम्यान परफॉर्म सादर केला असून, नेटिझन्सने त्याच्यावर टीका सुरू केली आहे. दोन्ही देशांदरम्यान वाद सुरू असताना मिकाला आता पाकिस्तानी मुलीचा मुका हवा आहे का? असा प्रश्न नेटिझन्स विचारू लागले आहेत.

भारताने जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर भारत-पाकमधील संबंध ताणले गेले आहेत. व्यापाराबरोबरच समझौता एक्सप्रेसही बंद करण्यात आली आहे. शिवाय, पाकिस्तानने भारतीय चित्रपटांवरही बंदी घातली आहे. दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले असताना मिका सिंग याने पाकिस्तानमध्ये जाऊन कला सादर केली.

मिका सिंगने कराचीतल्या एका अब्जाधीशाच्या मुलीच्या विवाहादरम्यान परफॉर्म केल्याचे वृत्त प्रसारीत झाले आहे. वृत्तामध्ये म्हटले आहे की, 'संबंधित पाक अब्जाधीशाचे पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्याशी जवळचे संबंध असून, हा लग्नसोहळा 8 ऑगस्ट रोजी होता. यावेळी मिकाने आपली कला सादर केली.' दरम्यान, सोशल मीडियावर मिकाच्या परफॉर्मन्सचा व्हिडिओ व्हायरल होत असून, त्याच्यावर जोरदार टीका होऊ लागली आहे. मिकाने पाकिस्तानात जाऊन परफॉर्म केल्यामुळे भारतीय चाहते ट्विटरवर तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. मिका यापूर्वीही चुंबन घेतल्यामुळे चर्चेत आला होता, यामुळे त्याला आता पाकिस्तानी मुलीचा मुका हवा आहे, असे नेटिझन्स विचारू लागले आहेत.

loading image