

Tech for Roots: London-based Techie Milind Ture Empowers Indian Small Businesses with AI
Sakal
पाली : बँकेत वारंवार विचारले जाणारे तेच ते प्रश्न असोत किंवा एखाद्या ट्रॅव्हल एजन्सीकडे केली जाणारी चौकशी, ग्राहक सेवेसाठी कर्मचाऱ्यांचा बराच वेळ आणि शक्ती खर्ची पडते. या समस्येवर लंडनमध्ये स्थायिक असलेल्या व मूळ रायगड जिल्ह्यातील पाली येथील मिलिंद तुरे या तरुण मराठी संगणक तंत्रज्ञाने एक जबरदस्त तोडगा शोधला आहे. मिलिंद यांनी 'AI.iShodh' (आयशोध) नावाचे एक विशेष व्यासपीठ विकसित केले असून, त्याद्वारे लहान व्यावसायिक व लघुउद्योगांसाठी अत्यंत कमी खर्चात 'एआय सपोर्ट बॉट' उपलब्ध करून दिला आहे.