esakal | लष्कारातील जवान पाकिस्तानी एजंटच्या संपर्कात; संशयानंतर अटक
sakal

बोलून बातमी शोधा

Military personnel

लष्कारातील जवान पाकिस्तानी एजंटच्या संपर्कात; संशयानंतर अटक

sakal_logo
By
सुधीर काकडे

भारतीय सैन्याची गुप्त माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या संशयातून भारतीय सैन्यातील सैनिकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांना माहिती पुरवल्याचा संशयातून उत्तर प्रदेशच्या आग्रा शहरातून लष्कराच्या जवानाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांनी मागच्या काही दिवसांत अनेक वेळा भारतीय सैन्याबद्दलची माहिती मिळवण्यासाठी सैन्यातील जवानांना सोशल मिडीयावरुन संपर्क साधत त्यांचा वापर करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते आहे. (Military personnel taken into custody in Agra, UP)

अशा घटना गेल्या काही वर्षांत वाढल्या आहेत. सैन्याच्या जवानांशी ऑनलाईन प्ल्रॅटफॉर्मवरुन संपर्कसाधुन भारतीय लष्कर आणि देशाच्या सुरक्षितते बद्दलची गुप्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न पाकिस्तानी गुप्तहेर करत असतात. सरकारी सुत्रांनुसार "विशेषत: लष्करी भागांच्या परिसरात अशा गुप्तहेरांच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवले जाते आहे. आग्रा येथील एका कार्यालतील काही कर्मचारी अनिष्ट घटकांच्या संपर्कात असल्याचं आमच्या गुप्तचर संस्थांच्या लक्षात येताच, त्यांना शोधण्यात आलं" असे एएनआयने दिलेल्या वृत्तामधून समोर आलं. या प्रकरणात काही जणांना आधीच ताब्यात घेण्यात आलं असून, त्यांची चौकशी केली जात आहे. तसेच कोणी अजून या प्रकरणात सहभागी आहे का याचा तपास केला जातो आहे.

हेही वाचा: पश्चिम बंगाल : बंदुकीचा धाक दाखवत 'मुथूट फायनान्स'वर दरोडा

दरम्यान, लष्करातील जवानांना अशा प्रकरणांपासून दुर ठेवण्यासाठी नेहमी सुचना दिल्या जातात. तरीही जर कुणी अशा घटनांमध्ये सहभागी असल्याचे आढळले तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाते. अशा प्रकरणांत लष्करातील अनेक जवानांना बडतर्फ करुन त्यांना तुरुंगात टाकण्यात आले आहे.

loading image
go to top