esakal | पश्चिम बंगाल : बंदुकीचा धाक दाखवत 'मुथूट फायनान्स'वर दरोडा; 12 किलो सोन्यासह 3 लाख लंपास
sakal

बोलून बातमी शोधा

Muthoot Gold Finance

पश्चिम बंगालमधील आसनसोलमध्ये मुथूट फायनान्स कार्यालयात शनिवारी दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत दरोडा टाकला.

पश्चिम बंगाल : बंदुकीचा धाक दाखवत 'मुथूट फायनान्स'वर दरोडा

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

पश्चिम बंगालमधील आसनसोलमध्ये मुथूट फायनान्स कार्यालयात शनिवारी दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत दरोडा टाकला. या दरोड्यात त्यांनी कार्यालयातील 12 किलो सोन्यासह 3 लाख रुपये लुटले. मुथूट फायनान्स कंपनीच्या (Muthoot Gold Finance Office) कार्यालयात दिवसाढवळ्या लुटण्याच्या या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडालीय. शनिवार सकाळी दरोडेखोरांनी सोने गहाण ठेवून कर्ज देणाऱ्या या कंपनीवर छापा टाकत सोन्यासह रोख रक्कमेची लूट केलीय. दरम्यान, दरोड्यानंतर ते अज्ञात दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. ही घटना घडताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला गती आणलीय.

'एएनआय'च्या वृत्तानुसार, अज्ञात दरोडेखोरांनी शनिवारी (ता. 11) मुथूट फायनान्सच्या कार्यालयात ही चोरी केलीय. कंपनीची कर्मचारी सोनाली म्हणाली, एक व्यक्ती आमच्या कार्यालयात घुसली आणि त्या व्यक्तीने बंदुकीचा धाक दाखवत आम्हाला पकडले. त्याचवेळी आणखी तीन लोक तिथे हजर झाले व त्यांनी एका गार्डला मारहाण करण्यास सुरुवात केली. तद्नंतर त्या बदमाशांनी 12 किलो सोने आणि 3 लाख रुपये रोख घेऊन पळ काढला, असा त्यांनी घटनेचा थरार सांगितला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले आणि त्यांनी तपासाला सुरुवात केलीय. या घटनेचा अधिक तपास सुरु आहे.

हेही वाचा: चिंतामणीमध्ये जीपची ट्रकला धडक, आठ जणांचा जागीच मृत्यू

loading image
go to top