
मदर डेअरीने दूध दरात वाढ केल्यानंतर आता अमूलनेसुद्धा दुधाच्या दरात वाढ केलीय. दूधाचे दर प्रति लीटर दोन रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. अमूलचे नवे दर १ मे पासून लागू होतील. देशभरात दूध दरात वाढ करण्यात आलीय. अमूलने म्हैशीच्या दुधासह स्टँडर्ड, गोल्ड, अमूल स्लिम अँड ट्रिम, अमूल चाय मजा, अमूल ताजा, अमूल गाय या दुधांच्या दरात वाढ केलीय. दुधाचे दर प्रति लीटर दोन रुपयांनी वाढवले आहेत. १ मे पासून नवे दर लागू केले जाणार आहेत.