मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मल कौर यांचे कोरोनामुळे निधन

त्या भारताच्या महिला व्हॉलीबॉल संघाच्या कर्णधार होत्या.
मिल्खा सिंग-निर्मल कौर
मिल्खा सिंग-निर्मल कौर

नवी दिल्ली: भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग (Milkha Singh) यांची पत्नी निर्मल कौर यांचे कोरोना संसर्गामुळे (corona infection) निधन झाले. कोरोनाशी संबंधित व्याधींमुळे त्यांचे निधन झाले. मागच्या महिन्यात निर्मल कौर यांना कोरोनाची लागण झाली होती. मिल्खा सिंग यांच्याप्रमाणे निर्मल कौर (Nirmal Kaur) या सुद्धा क्रीडापटू होत्या. त्या भारताच्या महिला व्हॉलीबॉल संघाच्या कर्णधार (volleyball team captain) होत्या. निर्मल कौर ८५ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती मिल्खा सिंग, एक मुलगा आणि तीन मुली असा परिवार आहे. (Milkha Singhs wife Nirmal Kaur dies of Covid-19)

"कोरोना विरोधात झुंज सुरु असताना आज दुपारी चारच्या सुमारास निर्मल कौर यांचे निधन झाले. हे आम्ही अत्यंत दु:खद अंतकरणाने जाहीर करत आहोत" असे मिल्खा सिंग यांच्या कुटुंबाच्यावतीने प्रवक्त्याने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

मिल्खा सिंग-निर्मल कौर
शिवसेनेचा मुख्यमंत्री अडीच वर्षांनी बदलणार? संजय राऊत म्हणतात...

"८५ वर्षाच्या निर्मल कौर या मिल्खा सिंग यांच्या कुटुंबाच्या कणा होत्या. आज संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पण मिल्खा सिंग यावेळी उपस्थित राहू शकते नाहीत. ते अजूनही ICU मध्ये आहेत" असे निवेदनात म्हटले आहे. निर्मल कौर यांना २६ मे रोजी मोहालीच्या फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. निर्मल कौर दाखल होण्याच्या दोन दिवसआधीच मिल्खा सिंग यांना सुद्धा कोविड संसर्गामुळे याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com