esakal | बाबरीचा इतिहास आमच्या पिढ्यांना सांगत राहू; ओवेसी यांचं वक्तव्य

बोलून बातमी शोधा

mim mp asaduddin owaisi interview about babri masjid

ओवेसी यांनी या मुलाखतीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रश्न विचारला आहे. पंतप्रधान मोदी या सोहळ्याला पंतप्रधान म्हणून जात आहेत की, वैयक्तिक उपस्थिती लावत आहेत, हे त्यांनी स्पष्ट करावे, असं ओवेसी यांनी म्हटलंय.

बाबरीचा इतिहास आमच्या पिढ्यांना सांगत राहू; ओवेसी यांचं वक्तव्य
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : अयोध्येत राम मंदिराच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमाची तयारी जोरात सुरू आहे. मंदिर कसे उभारले जाणार? काय होणार? या विषयी देशभरात चर्चा सुरू आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी या भूमीपूजन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज, एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी इंडिया टुडेला विशेष मुलाखत दिली. त्यात, 'बाबरी मशीद ही कायम स्मरणात राहील,' असं ओवेसी यांनी मुलाखतीत म्हटलंय.

देशभरातील घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ओवेसी यांनी या मुलाखतीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रश्न विचारला आहे. पंतप्रधान मोदी या सोहळ्याला पंतप्रधान म्हणून जात आहेत की, वैयक्तिक उपस्थिती लावत आहेत, हे त्यांनी स्पष्ट करावे, असं ओवेसी यांनी म्हटलंय. ओवेसी म्हणाले, 'बाबरी मशीद ही कायम स्मरणात राहील. आम्हाला तसा विश्वास आहे आणि हा विश्वास आमच्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. जर 6 डिसेंबर 1992ला मशीद पाडली नसती तर, कोर्टानं निकाल दिला असता, असं मला वाटत नाही. डिसेंबर 1949मध्ये मशीदीमध्ये मूर्ती ठेवण्यात आल्या आणि डिसेंबर 1992ला ती मशीदच पाडण्यात आली. याची इतिहासात नोंद झालीय. हा इतिहास कोणी पुसू शकणार नाही. आम्ही आमच्या पुढच्या पिढ्यांना ही मशीद पाडण्यात आल्याचं सांगत राहू. आमचा आवाज दाबला तरी, आम्ही ते सतत सांगत राहू.'

विदेशातील घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

1949मध्ये काय घडलं?
ओवेसी म्हणाले, 'बाबरी मशिदीमध्ये 22 डिसेंबर आणि 23 डिसेंबरच्या मध्यरात्री मूर्ती बसवण्यात आल्या. त्यानंतर मशीद बंद करण्यात आली. तात्कालीन जिल्हाधिकारी के के नायर यांनी तो निर्णय घेतला. फक्त हिंदू भाविकांना एका बाजूने प्रार्थना करण्याची अनुमती देण्यात आली होती. मूर्ती हटविण्याला नायर यांनी अनुमती दिली नाही. 1986मध्ये जिल्हा न्यायालयाच्या एका निर्णयानंतर अवघ्या 50 मिनिटांत मशिदीचं कुलूप काढण्यात आलं होतं. दुपारी 4.10ला कोर्टानं निकाल दिला आणि 5 वाजता मशिदीचं कुलूप काढण्यात आलं. त्यावेळी मुस्लिमांना बाजूला ठेवण्यात आलं, असं ओवेसी यांनी मुलाखतीत सांगितलं. देशाचे तात्कालीन पंतप्रधान आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री 6 डिसेंबर 1992रोजी बाबरी मशीद वाचवून शकले नाही, मुळात शिलान्यासाची अनुमती दिली नसती तर बाबरी मशीद पडली नसती, असंही ओवेसी मुलाखतीत म्हणाले.