2024 च्या विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीला मोठा धक्का बसणार : आठवले

Ramdas Athawale
Ramdas Athawaleesakal
Summary

राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झालाय.

जळगाव : नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) शिवसेनेचे उमेदवार संजय राऊत (Sanjay Raut), काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल पटेल विजयी झाले आहेत. तर भाजपचे उमेदवार अनिल बोंडे, पीयूष गोयल आणि धनंजय महाडिक हेही विजयी झाले आहेत. या निकालाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनीही आपली प्रतिक्रिया दिलीय.

आठवले म्हणाले, राज्यसभा निवडणुकीत प्रयत्न करूनही महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi Government) पराभव स्वीकारावा लागला. हा महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का आहे. त्यामुळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) सत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही, असं वक्तव्य त्यांनी केलंय. ते रविवारी मुक्ताईनगर येथील कार्यक्रमात बोलत होते.

Ramdas Athawale
के चंद्रशेखर राव भाजप-काँग्रेसला टक्कर देणार; लवकरच नव्या राष्ट्रीय पक्षाची स्थापना

दरम्यान, आठवलेंनी महाविकास आघाडीवरही निशाणा साधलाय. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झालाय. ही सरकारसाठी मोठी नामुष्की आहे. राज्यसभा निवडणुकीप्रमाणं २०२४ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीला मोठा धक्का बसेल, असं भाकीतही आठवलेंनी वर्तविलंय. महाविकास आघाडीनं उमेदवार उभा केल्यानंच भाजपनं धनंजय महाडिकांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांचा विजयही झाला. या निवडणुकीत अपक्षांची मतं ही भाजपच्या पारड्यात पडली असून त्यामुळं महाविकास आघाडीचा मोठा अपमान झालाय, असंही केंद्रीय मंत्री म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com