स्मृती इराणींचा गंभीर आरोप; 'शाहीनबाग आंदोलनाच्या आडून जिन्नांच्या स्वातंत्र्याची चर्चा'

टीम ई सकाळ
गुरुवार, 30 जानेवारी 2020

2019 च्या लोकसभा निवडणुकीत अपयशी ठरलेले पक्ष आता शाहिनबाग सारख्या देशविरोधी आंदोलनाला पाठिंबा देत असल्याची टीका आज केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केली.

अमेठी : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अपयशी ठरलेले पक्ष आता शाहिनबाग सारख्या देशविरोधी आंदोलनाला पाठिंबा देत असल्याची टीका आज केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केली. अमेठी मतदारसंघाच्या एक दिवसाच्या दौऱ्यासाठी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आल्या होत्या. त्यांनी भेटुआ ब्लॉक येथे शेतकरी कल्याण केंद्राचे उद्‌घाटन आणि सहा कोटींच्या खासदारनिधीतील वीस विविध विकास योजनांचा शुभारंभ केला. या वेळी त्यांनी कॉंग्रेस, आम आदमी पक्ष, समाजवादी पक्ष, बसपवर टीका केली. शाहीनबाग आंदोलनाच्या आडून जिन्नांच्या स्वातंत्र्याची भाषा होऊ लागली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, की देशाची फाळणी करण्याची भाषा करणाऱ्यांना आप आणि अन्य पक्ष समर्थन देत आहेत. शाहिनबागच्या आंदोलनात देशविरोधात घोषणाबाजी केली जात आहे आणि राज्यघटनेबाबत आक्षेपार्ह बोलत आहेत. आज महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे. शाहिनबागच्या व्यासपीठावरून महात्मा गांधी यांच्याबाबतही वादग्रस्त विधानं केली जात आहेत. देशविरोधात सुरू असलेल्या आंदोलनास आप पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांनी पाठिंबा दिल्याचा दावा इराणी यांनी या वेळी केला.

Delhi Election 2020 :'भारतीय मुस्लिमांना देशाबाहेर काढणे तर...'; राजनाथ सिंहांचे मोठे वक्तव्य

स्मृती इराणी म्हणाल्या म्हणाल्या, 'शाहिनबागच्या आडून राजकारण करणारे आणि देशविरोधात घोषणाबाजी करणाऱ्यांना आपण विचारू इच्छितो की, आपले राजकारण इतक्‍या खालच्या थराला पोचले का, की आपण पराभव पचवू शकलो नाही, म्हणून अशा प्रकारच्या व्यासपीठावरून फाळणीची भाषा वापरली जात आहे. ही जिनांची भाषा आहे. या देशविरोधी आंदोलनाकडे संपूर्ण देश पाहत आहे. देशवासीयांच्या मनात असंतोष खदखदत आहे.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: minister smriti irani statement about shaheen bagh protest amethi uttar pradesh