esakal | सरकारनं रेशन कमी केलंय, आम्ही मरावं का? शेतकऱ्यांनी मेलेलंच बरं; कर्नाटकच्या मंत्र्यांची जीभ घसरली

बोलून बातमी शोधा

सरकारनं रेशन कमी केलंय, आम्ही मरावं का? शेतकऱ्यांनी मेलेलंच बरं; कर्नाटकच्या मंत्र्यांची जीभ घसरली

सरकारनं रेशन कमी केलंय, आम्ही मरावं का? शेतकऱ्यांनी मेलेलंच बरं; कर्नाटकच्या मंत्र्यांची जीभ घसरली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बंगळूर : अन्न व नागरीपुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी वादग्रस्त विधान केले आहे. शिधापत्रिकेवर केवळ दोन किलो तांदूळ वितरित केले जात असून लॉकडाउन घोषित केल्यामुळे एका शेतकऱ्याने मंत्री कत्ती यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून 'लॉकडाऊनमुळे कामे बंद असून दोन किलो तांदूळ महिनाभर पुरतील का?' अशी विचारणा केली. काम बंद आणि रेशन कमी असल्याने आम्ही मरावे का? असा प्रश्न शेतकऱ्याने उपस्थित केला होता. त्यावर 'मेलेले बरे असे म्हणत मंत्री कत्ती यांनी त्यांच्याशी बोलणे टाळले होते. पण या संभाषणाचा ऑडिओ व्हायरल झाला आहे.

दरम्यान, मंत्री कत्ती यांनी शेतकऱ्याला दिलेल्या उद्धट उत्तराचे समर्थन केले आहे. धान्य नसले म्हणून कोणी मरतो का?, म्हणत त्यांनी यातून अंग काढण्याचा प्रयत्न केला आहे. या वादग्रस्त विषयावर सारवासारव करण्यासाठी बुधवारी (२७) त्यांनी पत्रकार परिषद घेतली. प्रारंभी आपण असे विधान केले नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना पत्रकारांनी ऑडीओ दाखविल्यानंतर त्यांनी त्याचे समर्थन करीत हा ऑडिओचा प्रकार शेतकऱ्याचा नसून स्वस्त धान्य दुकानातील रेशनचा काळाबाजार करणाऱ्यांचा आहे. धान्य मिळत नाही म्हणून कोणी मरत नाही, असे म्हणत आपल्या वादग्रस्त विधानाचे समर्थन केले.

हेही वाचा: International Dance Day : नसानसांत भिनलेल्या नृत्यामधून चैतन्यदायी ऊर्जा!

मंत्री कत्ती म्हणाले, शेतकऱ्यानेच आपल्याला मरू का? असे विचारल्यानंतर आपण त्यास तसे म्हणालो. आणखी आपण काय उत्तर देणार? तोच चुकीचे बोलत होता. स्वस्त धान्य दुकानातून पाच किलो तांदूळ ऐवजी दोन किलो तांदूळ व तीन किलो गहू किंवा जोंधळा दिला जात आहे. आता केंद्राकडूनही पाच किलो तांदूळ दिला जाणार आहे. काळ्या बाजारात तांदूळ विक्री करणे आधी थांबविले पाहिजेत, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांकडून खेद व्यक्त

बंगळूर : मंत्री उमेश कत्ती यांनी केलेल्या बेजबाबदार वक्तव्याचा राजकीय वर्तुळात निषेध व्यक्त करण्यात येत आहे. सोशल मीडियावर जोरदार टीका सुरू होताच मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी दिलगिरी व्यक्त केली. एका मंत्र्याला असे बोलणे शोभत नाही. गव्हाची गरज नसलेल्या भागातील लोकांना ५ किलो तांदूळ देण्याची व्यवस्था केली जाईल, असे सांगून मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात, उमेश कत्ती यांच्या विधानाबद्दल खेद व्यक्त केला आहे.

हेही वाचा: झक्कास! उन्हाळी सोयाबीनचा वाळवा पॅटर्न; 100 एकरावर लागवड