esakal | झक्कास! उन्हाळी सोयाबीनचा वाळवा पॅटर्न; १०० एकरावर लागवड

बोलून बातमी शोधा

झक्कास! उन्हाळी सोयाबीनचा वाळवा पॅटर्न; 100 एकरावर लागवड
झक्कास! उन्हाळी सोयाबीनचा वाळवा पॅटर्न; 100 एकरावर लागवड
sakal_logo
By
शामराव गावडे

नवेखेड (सांगली) : सोयाबीन बियाणे आपल्या परिसरात उपलब्ध व्हावे हा उद्देश ठेवून वाळवा तालुका कृषी विभागाच्या वतीने तालुक्यात १०० एकरावर उन्हाळी सोयाबीनचा वाळवा पॅटर्न विकसित केला आहे. तालुका कृषी अधिकारी भगवानराव माने यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला आहे. गतवर्षी अतिवृष्टीमुळे तालुक्यात तसेच ज्या ठिकाणी सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचा फटका बियाणे टंचाईला बसू शकतो हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन वाळवा तालुक्यातील शेकऱ्यांना एकत्र करून त्यांना सोयाबीन या नगदी पिकाचे महत्व पटवून दिले व उन्हाळी हंगामात हे पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना तयार केले.

उन्हाळी सोयाबीनचे उत्पादन घेण्यासाठी या पूर्वी शेतकरी फारसे उत्साही नसायचे. कारण उत्पादन कमी यायचे. साधारणपणे ज्या शेतकऱ्यांचा खोडवा लवकर गेला आहे किंवा रताळी अन्य पिके घेऊन शेत रिकामे आहेत, पाण्याची सोय आहे, असे शेतकरी यासाठी निवडले. शेतकरी बचतगट तसेच शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या यांची मदत घेत १०० एकरावर उन्हाळी सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. त्यासाठी तीन फुटाची सरी सोडण्यात आली. चांगली उत्पादन क्षमता असणारे के. डी. एस ३४७ हे वाण निवडले आहे. चांगल्या उत्पादनाबरोबर तांबेरा प्रतिरोधक म्हणून हे वाण परिचित आहे. वेळच्या वेळी पाणी नियोजन, रोग किडींचा बंदोबस्त यासाठी कृषी विभागाच्या लोकांनी शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. सध्या या उन्हाळी सोयाबीनची चांगली वाढ झाली आहे. उन्हाळी सोयाबीनचे हे बियाणे येत्या खरीप हंगामात बियाणे म्हणून शेतकऱ्यांना वापरण्यास मिळणार आहे

हेही वाचा: Video - कोरोनामुक्तीसाठी प्लाझ्मादान गरजेचे; दानशूरांची संख्या कमी

सोयाबीनचे अंतर पीक घ्या

तालुका कृषीअधिकारी भगवानराव माने म्हणाले, तालुक्यातील शेतकऱ्यांनी येत्या हंगामात 'मे'च्या शेवटी व जूनच्या पहिल्या आठवड्यात आडसाली ऊस लावणं टाळावी. त्या ऐवजी सोयाबीनचे नगदी पीक घ्यावे. अडीच महिन्याचे पीक झाल्यावर पाने पिवळी पडून गळतात. त्यावेळी स्वतः तयार केलेली सुपर केन नर्सरी लावावी. आडसलची नोंद होते. एकरी १५ ते २० क्विंटल उत्पन्न मिळते. उसाचा उत्पादन खर्च निघूनदोन पैसे शेकऱ्याला मिळतील. तालुक्यातील प्रतिएकर २१ क्विंटलचे उत्पन्न या पूर्वी वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांनी घेतले आहे.