PM Narendra Modi: देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याआधी आता मंत्र्यांना आरटीपीसीआर टेस्ट करावी लागणार आहे. टेस्ट केल्यानंतरच मंत्र्यांना पंतप्रधानांची भेट घेता येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.