New Parliament Building : आता PM मोदी आणणार ७५ रुपयांचं नाणं! वापरली जाणार ५० टक्के चांदी | Ministry of Finance to launch a special Rs 75 coin | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ministry of Finance to launch a special Rs 75 coin to commemorate the inauguration of  new Parliament building

New Parliament Building : आता PM मोदी आणणार ७५ रुपयांचं नाणं! वापरली जाणार ५० टक्के चांदी

नवी दिल्ली येथे २८ मे रोजी नवीन संसद भवनाच्या इमारतीचे उद्घाटन केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या इमारतीचं लोकार्पण करणार आहेत. दरम्यान हा क्षण स्मरणात राहावा यासाठी या दिवशी अर्थ मंत्रालयाकडून विशेष ७५ रुपयांचे नाणे लॉन्च करण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या नाण्यावर या नवीन संसद भवनाची प्रतिमा सेच त्याचे नाव देखील देण्यात येईल. नवीन संसदेच्या इमारतीचे उद्घाटन २८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

कसे असेल नाणे?

अधिसूचनेनुसार ७५ रुपयांचे नाणे गोल आकारचे असेल. याचा व्यास ४४ मिलीमिटर आणि काठ २०० सेरेशन असेल. ७५ रुपयांचे हे नाणे चार धातूंपासून बनवले जाईल. ज्यामध्ये ५० टक्के चांदी, ४० टक्के तांबे, ५ टक्के निकल, आणि ५ टक्के झिंक वापरले जाणार आहे. तसेच यावर नवीन संसद भवन इमारतीखाली २०२३ देखील लिहीलेलं असेल.

तर नाण्याच्या समोरच्या बाजूस मध्यभागी अशोक स्तंभावरील सिंह आणि सत्यमेव जयते लिहीलेलं असेल. नाण्यावर देवनगरी लिपीत भारत आणि इंग्रजीत इंडिया लिहीलेलं असेल. तसेच संसद भवन हे शब्द देखील देवनागरी आणि इंग्रजी भाषेत दिले जातील. नाण्याचं डिझाईल संविधानाचील पहिल्या अनुसूचीत दिलेल्या सूचनांनूसार असेल.

नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावरून गोंधळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे . नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाचे प्रकरण सुप्रीम कोर्टातही पोहोचले असून त्यावर शुक्रवारी (२६ मे) सुनावणी होणार आहे. २५ राजकीय पक्षांनी विरोधी पक्षांच्या बहिष्कार टाकल्यानंतर देखील नवीन संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे सरकारचे निमंत्रण स्वीकारले आहे . तब्बल २१ विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे.

कार्यक्रमात कोण कोण सहभागी होणार?

NDA च्या १८ सदस्य राजकीय पक्षांव्यतिरिक्त, NDA नसलेल्या सात पक्षांनी कार्यक्रमात सहभागी होण्याचे निमंत्रण स्वीकारले आहे. बसपा, शिरोमणी अकाली दल, जेडीएस, लोक जनशक्ती पार्टी (रामविलास), वायएसआर काँग्रेस, बीजेडी आणि टीडीपी यांनी या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले आहे.

टॅग्स :Narendra Modi