
Lok Sabha Election 2024: लोकसभेसाठी भाजप-शिवसेनेचा फॉर्म्यूला ठरला? कोणाला किती जागा, वाचा सविस्तर
देशभरात लोकसभेच्या निवडणुकांची तयारी सर्व राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. या मध्ये महाराष्ट्रात देखील मविआ आणि भाजप-शिवसेनेने लोकसभेसाठी कंबर कसली आहे. यासोबतच आता भाजप-शिवसेना महायुतीच्या जागा वाटपाची प्राथमिक चर्चा सुरु आहे.
गुरुवारी शिवसेना आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक झाली.या बैठकीत भाजप २६ आणि शिवसेना २२ असा फॉम्युला ठरला असल्याचे समजते. ही प्राथमिक चर्चा झाली आहे.
यानंतर अजून बैठक होऊन जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित होते.
दरम्यान २०२४ मध्ये देशात लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. यासाठी देशातील सर्वत राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. मविआच्या तिन्ही पक्षांनी यासाठीच्या बैठका सुरू केल्या आहेत.
महाविकास आघाडीतली काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना (ठाकरे गट) आणि मित्र पक्ष या पक्षांच्या एकत्रित बैठका होत असताना दुसऱ्या बाजूला हे तिन्ही पक्ष स्वतंत्र बैठका देखील घेत आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या कोर कमिटीची नुकतीच बैठक झाली.
या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. या बैठकीनंतर या तिन्ही नेत्यांनी काँग्रेसची आगामी निवडणुकांसाठीची भूमिका मांडली.
तर मविआच्या जागा वाटपावर मविआच्या सर्व पक्षातील तीन-तीन नेते यावर निर्णय घेणार आहेत.
सरकारनामाच्या वृत्तानुसार...