Telegram: टेलिग्रामवर मोफत चित्रपट आणि वेब सिरीज पाहणाऱ्यांना धक्का! आता फुकट काही पाहता येणार नाही; केंद्र सरकारची मोठी कारवाई

Telegram Notice Pirated Content: माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० अंतर्गत टेलिग्रामला नोटीस बजावली आहे. ज्यामध्ये त्यांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून पायरेटेड कंटेंट काढून टाकण्यास सांगितले आहे.
Telegram Notice Pirated Content

Telegram Notice Pirated Content

ESakal

Updated on

टेलिग्रामला त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून पायरेटेड कंटेंट काढून टाकावा लागेल. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (MIB) माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० अंतर्गत टेलिग्रामला नोटीस बजावली आहे. त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून पायरेटेड कंटेंट काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. जिओ सिनेमा, अमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि इतर ओटीटी प्लॅटफॉर्म्सकडून टेलिग्रामवर कॉपीराइट केलेल्या कंटेंटची मोठ्या प्रमाणात पायरसी होत असल्याचा आरोप करणाऱ्या तक्रारींनंतर मंत्रालयाने ही कारवाई केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com