अभिनंदन यांना मार्गदर्शन करणाऱ्या महिला अधिकाऱ्याला 'युद्ध सेवा मेडल'

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

२७ फेब्रुवारीला पाकिस्तानी फायटर विमाने भारतात घुसली होती. त्यावेळी झालेल्या डॉगफाइटमध्ये मिंटी यांनी वॉर रुममधून विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना मार्गदर्शन केले होते. 

मुंबई : बालाकोट एअर स्ट्राइकच्या वेळी अभिनंदन याना वार रम मधून मार्गदर्शन करणाऱ्या IAF च्या स्क्वाड्रन लीडर मिंटी अग्रवाल यांना 'युद्ध सेवा मेडल पुरस्कार' जाहीर झाला आहे. युद्धाच्या काळातील उल्लेखनीय कामगिरीसाठी युद्ध सेवा मेडल या पुरस्काराने सन्मानित केले जाते.

२७ फेब्रुवारीला पाकिस्तानी फायटर विमाने भारतात घुसली होती. त्यावेळी झालेल्या डॉगफाइटमध्ये मिंटी यांनी वॉर रुममधून विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना मार्गदर्शन केले होते. 

आकाशात नेमकी काय स्थिती आहे. पाकिस्तानी फायटर विमान कुठे, कुठल्या दिशेला आहेत त्याची माहिती त्या भारतीय वैमानिकांना देत होत्या. मिंटी अग्रवाल यांनीच विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना माघारी फिरण्यास सांगितले होते. पण पाकिस्तानच्या एफ-१६ फायटर विमानांमध्ये कम्युनिकेशन सिस्टिम जॅम करण्याची यंत्रणा असल्यामुळे अभिनंदन यांच्यापर्यंत तो संदेश पोहोचलाच नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minty Agarwal IAF Squadron leader felicitate for medal