Miraj Facebook Fraud Case
esakal
-शरद जाधव
Miraj Facebook Fraud : फेसबुकवर ‘ती’ची एक रिक्वेस्ट येते...अनोळखी आणि कोणताही विचार न करता ती स्वीकारलीही जाते...त्यानंतर हळूहळू बोलणं सुरू होतं... नियमित बोलणं सुरू झाल्यानंतर भावनिक बोलणं वाढवून अलगदपणे जाळ्यात ओढणं आणि त्यानंतर सुरू होतो सिलसिला...यातूनच मग एकांतात बोलवलं जातं आणि तिथेच त्या व्यक्तीला जाळ्यात अडकवून थेट लुबाडलं जातं. अशी चार प्रकरणे मिरज शहरात उघडकीस आली आहेत. या संपूर्ण प्रकरणामागचे तथ्य जाणून घेत ‘समाजमाध्यम वीरां’नी शायर राहत इंदोरी यांच्या ‘बुलाती है, मगर जाने का नहीं’ शेरमधून हाच धडा घ्यायला हवा.