
मुलाला दिले इलेक्ट्रिक शॉक; मिराम तेरनच्या वडिलांचा आरोप
माझ्या मुलावर चिनी सैन्याने अनेक अत्याचार केले. त्याला बहुतेक वेळा डोळ्यांवर पट्टी बांधून ठेवली होती. त्याचे हातही बांधलेले होते. चिनी अधिकाऱ्यांनी त्याला लाथांनी मारहाण केली, अगदी इलेक्ट्रिक शॉकही (Electric shock) दिला, असे मिराम तेरनचे (Miram Teran) वडील ओपांग तेरन (Fathers Accusation) यांनी सांगितले.
अरुणाचल प्रदेशातून चिनी सैन्याने अपहरण केलेल्या तरुणाच्या प्रकरणात धक्कादायक बाब समोर आली आहे. माझ्या मुलाचा चिनी सैन्याने मानसिक आणि शारीरिक छळ केला. त्यामुळे मीराम अजूनही शॉकमध्ये आहे, असेही ओपांग यांनी सांगितले. चिनी सैन्याने २७ जानेवारी रोजी मीरामला भारतीय लष्कराच्या ताब्यात दिले होते. परंतु, त्याला वेगळे ठेवण्यात आले होते.
हेही वाचा: मटण खाल्ल्यानंतर हे पदार्थ खाणे टाळा; अन्यथा या परिणामांना तयार राहा
सोमवारी त्याला कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. जिल्हा उपायुक्त शाश्वत सौरभ यांनी सांगितले की, भारतीय लष्कराने सियांग जिल्ह्यात आयोजित एका कार्यक्रमात मीरामला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले. घरी परतल्यानंतर स्थानिक प्रशासनाकडूनही त्यांचे स्वागत करण्यात आले.
१८ जानेवारी रोजी झाला होता बेपत्ता
१८ जानेवारी रोजी मिराम (Miram Teran) अरुणाचल प्रदेशातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळून बेपत्ता झाला होता. यानंतर चिनी सैन्याने त्यांचे अपहरण केल्याचे समोर आले. मात्र, चिनी लष्कराने हा आरोप फेटाळून लावला आहे. त्यानंतर चीनमध्ये हरवलेला तरुण सापडल्याची माहिती चिनी अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
Web Title: Miram Teran Electric Shock Fathers Accusation Arunachal China
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..