
मटण खाल्ल्यानंतर हे पदार्थ खाणे टाळा; अन्यथा या परिणामांना तयार राहा
अनेकांना मांसाहारी (Carnivory) जेवण आवडते. चिकन, मटण (Mutton), फिश खाणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. ते एकप्रकारे याचे दिवानेच असतात. आठवड्यातून दोन ते तीन दिवस याचा आस्वाद घेत असतात. मांसाहार केल्याने शक्ती वाढते, असा त्यांचा समज असतो. मटण खाण्याची एक वेगळीच मजा असते. मात्र, मटण खाल्यानंतर काही प्रदार्थ चुकूनही सेवन करायला नको. यामुळे मोठे नुकसान सोसावे लागू शकते.
जगभरात मांसाहार करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. काही लोकांना शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पदार्थ खायला आवडतात. अंडी, चिकन आणि मटण हे लोकांचे आवडते मांसाहारी पदार्थ आहेत. विशेषतः मटण हे अनेक लोकांचे आवडते. तथापि, शाकाहार आणि मांसाहार दोन्हीचे स्वतःचे फायदे आहेत. पण जे लोक मटण (Mutton) खातात त्यांनी मटणासोबत विशिष्ट प्रकारच्या गोष्टी खाणे टाळावे.
हेही वाचा: तुम्हाला आमचा पाहुणा बनावं लागेल; मुंबई पोलिसांचं वाइनबद्दल विचारणाऱ्याला भन्नाट उत्तर
मटण (Mutton) पचायला जड असते. ते पचायला किमान ७२ तास लागतात. म्हणूनच मटण रात्री न खाता दिवसा खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे मटणाचे पूर्ण पचन होईपर्यंत कोणते पदार्थ खाऊ नये हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या पदार्थाचे सेवन न केल्यास मोठा फायदा होईल. मटण खाऊन तुम्ही नमूद केलेले पदार्थ खाल्ले तर शरीरात विषारी पदार्थ निर्माण होतात. याचा थेट परिणाम हृदय, किडणी आदींवर होऊ शकतो.
दुधाचे पदार्थ
मटण खाल्यानंतर दुधाचे पदार्थ खायला नको. कारण, दुधामध्ये अँटिबायोटिक गुणधर्म असतात. याचा आणि मटणाचा संपर्क येतो तेव्हा नुकसान होते. परंतु, मटणासोबत (Carnivory) दह्याचे सेवन करू शकता.
जेवण केल्यानंतर लगेच झोपणे
जेवण केल्यानंतर लगेच झोपणे हानिकारक असते. यामुळे अपचनाचा त्रास होतो. जळजळणे व पित्ताचा त्रास वाढतो. मटणाचा भाजीत मोठ्या प्रमाणात मसाला जास्त वापरत असल्याने किमान अर्धा तास तरी झोपू नये.
जेवणानंतर चहा
अनेकांना जेवण केल्यानंतर चहा पिण्याची सवय असते. चहा प्रत्येकाला आवडत असला तरी त्याचे सेवन हानिकारक आहे. यामुळे गॅस, अपचनाचा त्रास होऊ शकतो. तसेही चहामध्ये दूध वापरले जाते.
सिगारेट ओढू नका
मांसाहार (Carnivory) केल्यावर सिगारेट ओढणे हानिकारक आहे. सिगारेट पिणे तसेही हानिकारक आहे. मात्र, जेवण केल्यानंतर त्याचे सेवन केल्याने अधिक नुकसान सोसावे लागू शकते. यामुळे भयंकर आजारांना निमंत्रण मिळते.
मध
मधामध्ये जे घटक असतात त्याचा परिणाम थेट हृदय किंवा किडणीवर होतो. त्यामुळे मटण खाल्ल्यानंतर मधाचे सेवन टाळणे गरजेचे आहे. मटण खाल्ल्यानंतरही शरीरात उष्णता निर्माण होते. कारण, मटनामध्ये गर्मी जास्त प्रमाणात असते. म्हणून मटण खाल्यानंतर किंवा खाण्यापूर्वी कधीच मध खाऊ नये.
Web Title: Mutton Carnivory What Not To Eat Big Loss
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..