
यूपीएससी पॅनलकडून तिला तिने परिधान केलेल्या साडीविषयी एक खास प्रश्न विचारण्यात आल्याची आठवण तिने सांगितली.
नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने मागील काही दिवासापूर्वी नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर केला. यामध्ये मिस इंडिया फायनलिस्ट ऐश्वर्या शेरानने ९३वी रँक मिळवली होती. या यशानंतर तिचं सर्वत्र कौतुक केलं असून मॉडेलिंग क्षेत्रात नाव कमावल्यानंतर अभ्यासाच्या जोरावर ती IAS बनली. अशात तिने आजतकशी संवाद साधला असता यूपीएससी पॅनलकडून तिला तिने परिधान केलेल्या साडीविषयी एक खास प्रश्न विचारण्यात आल्याची आठवण तिने सांगितली.
ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
ऐश्वर्याने सांगितले की युपीएसीच्या मुलाखतीवेळी अनौपचारिक चर्चेला सुरुवात होते, त्यावेळी तुमच्या व्यक्तिमत्वाविषयी तपासणी सुरु होते. तुम्ही एक अधिकारी बनण्यासाठी पात्र आहात का? या सर्व बाबी तपासून पाहिल्या जातात. त्यावेली मला एक मजेदार प्रश्न विचारण्यात आला होता की, तुम्ही जी साडी परिधान केली आहे ती साडी कोणती आहे? त्यावर उत्तर देताना ऐश्वर्याने सांगितले होते की, या साडीविषयी मला जास्त काही माहित नाही, परंतु ही साडी खूप सुंदर आहे आणि मला आवडते. ऐश्वर्याने पुढे सांगितले की, असे मजेदार प्रश्न पॅनलकडून विचारले जातात कारण, पॅनलला जाणून घ्यायचे असते की, ज्या प्रश्नाचे उत्तर उमेदवाराला येत नाही, त्या प्रश्नासोबत उमेदवार कशाप्रकारे डील करतो.
ऐश्वर्याची मुलाखत जवळपास २५ ते ३० मिनीटे चालली असल्याचे तिने सांगितले. या २५ ते ३० मिनीटाच्या मुलाखतीत अनेक मजेदार प्रश्नही विचारण्यात आले होते. त्यासोबतच, ऐश्वर्याचा विषय हा इकॉनॉमिक्स असल्याने तिला मोठ्या प्रमाणावर इकॉनॉमिक्स संबंधितच प्रश्न विचारण्यात आले होते. दरम्यान, विज्ञान शाखेचं शिक्षण घेतलेल्या ऐश्वर्यानं अभ्यास आणि इच्छाशक्तीच्या जोरावर हे यश मिळवलं आहे. युपीएससीमध्ये यश मिळाल्यानंतर माध्यमांशी बोलताना ऐश्वर्या म्हणाली की, माझ्या आईने माजी मिस वर्ल्ड आणि अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या नावावरून माझं नाव ठेवलं होतं अशी आठवणही तिने सांगितली होती.
ऐश्वर्याने उच्च शिक्षणासाठी श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये प्रवेश घेतला होता. तिचे वडील कर्नल अजय कुमार हे एनसीसी तेलंगणा बटालियनचे कमांडिंग ऑफिसर आहेत. ऐश्वर्याने युपीएससीमध्ये यश मिळवल्यानंतर तिच्या या यशाबद्दल मिस इंडियाकडून तिचे अभिनंदन करण्यात आलं होतं. केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या निकालामध्ये हरियाणाच्या प्रदीप सिंगने अव्वल क्रमांक पटकावला होता तर दुसऱ्या क्रमांकार जतिन किशोर आणि तिसऱ्या क्रमांकावर प्रतिभा वर्मा यांनी स्थान पटकावले होते.
त्यावेळी ऐश्वर्याने सांगितलं होतं की, आईला वाटत होतं की मी मॉडेलिंगमध्ये नाव कमवावं. तिला अजुनही वाटत की मिस इंडिया व्हावं. माझी निवड मिस इंडियाच्या 21 फायनलिस्टमध्ये झाली होती. मात्र मला पहिल्यापासूनच प्रशासकीय सेवेत काम करायचं होतं आणि माझी इच्छाही होती. प्रशासकीय सेवेत जायचं ठरवल्यानंतर मॉडेलिंगचे करिअर थांबवले आणि परीक्षेची तयारी सुरु केली. मॉडेलिंगच्या करिअरमधून बाहेर पडणं आणि आयएएस होणं सोपं नव्हतं. मात्र अशक्य असंही काही नव्हतं. शेवटी त्यात यश मिळालेच.