
अहमदाबाद : ‘‘मी विमान अपघाताबद्दल ऐकल्यानंतर मी अक्षरशः थरथर कापत होते. मला विमानतळावर पोहोचण्यास उशीर झाला त्यामुळे मी त्या विमानात बसून शकले नाही. मी दुपारी दीड वाजता विमानतळावरून बाहेर पडले आणि काही मिनिटांतच विमान कोसळल्याची बातमी आली,’’ अशी प्रतिक्रिया भूमी चौहान या युवतीने दिली आहे.