‘चांगल्यासाठी चांगले’च होते!;  मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांनी केले बिहारींचे कौतुक 

उज्ज्वल कुमार - सकाळ न्यूज नेटवर्क 
Monday, 1 June 2020

मिझोरामचे मुख्यमंत्री झोरमथंगा यांनीही हा व्हिडिओ पाहिला आणि बिहारी बाबूंची सेवाभावी वृत्ती पाहून ते इतके खूष झाले की ‘चांगल्यासाठी चांगले’ असे ट्विट करुन त्यांनी या लोकांचे कौतुक केले. 

पाटणा - कोरोनाच्या संकटात हाताला काम नसल्याने घराकडे परतणाऱ्या स्थलांतरित मजुरांना मदत न मिळाल्याने त्‍यांच्या व्यस्था सर्वांसमोर आल्या आहेत. पण अनेक अनामिक या मजुरांना मदतही करत आहेत, हे एका व्हिडिओतून दिसले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नवी दिल्लीहून मिझोरामला निघालेली श्रमिक रेल्वे बिहारमधील बेगुसराय येथे थांबली असताना प्रवाशांना अन्न आणि पाणी देण्यासाठी गावातील नागरिक धावून आले. अन्नाची पाकिटे वाटताना त्यांनी खबरदारी म्हणून पीपीई संच व मास्कचा वापर केला होता. या सर्व घटनेचे मोबाईल छायाचित्रण गाडीतीलच एका स्थलांतरित मजुराने केले व मिझोरामला पोचल्यावर हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. 

आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मिझोरामचे मुख्यमंत्री झोरमथंगा यांनीही हा व्हिडिओ पाहिला आणि बिहारी बाबूंची सेवाभावी वृत्ती पाहून ते इतके खूष झाले की ‘चांगल्यासाठी चांगले’ असे ट्विट करुन त्यांनी या लोकांचे कौतुक केले. याचबरोबर झोरमथंगा यांनी पूर्वीच्या व्हिडिओचा उल्लेख करीत घरी परतणाऱ्या मिझो नागरिकांनी आसाममधील पूरग्रस्तांना त्यांचे स्वतःचे जेवण दिले होते, अशी आठवणही सांगितली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट 
या व्हिडिओ एक-दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून अन्न-पाण्याचे वाटप करणाऱ्या गटाचे कौतुक होत आहे. काही जणांनी हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट असल्याचे सांगितले आहे तर काहींनी एकीचे फळ असल्याचे म्हटले आहे. काही जणांनी याचा संबंध देशभक्ती आणि भारतीयत्वाशी जोडला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mizoram Chief minister Zoramthanga lauded the people of Bihari Babu