esakal | सर्वात जास्त मुलं असणाऱ्या पालकांना क्रीडामंत्र्यांनी दिलं इतकं 'बक्षीस'; जाणून घ्या कारण I Mizoram
sakal

बोलून बातमी शोधा

Baby Boom
'बेबी बूम'ला प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडामंत्री रोयटे यांनी 17 पालकांना बक्षीस दिलंय.

सर्वात जास्त मुलं असणाऱ्या पालकांना क्रीडामंत्र्यांनी दिलं इतकं 'बक्षीस'

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

Cash for parent of most children : मिझोरमच्या चर्च आणि नागरी समाज संघटनांनी (Mizoram churches and civil society organisations) केलेल्या 'बेबी बूम'ला (Baby Boom) प्रोत्साहन देण्यासाठी राज्याचे क्रीडा मंत्री रॉबर्ट रोमाविया रोयटे (Sports Minister Robert Romawia Royte) यांनी मंगळवारी 17 पालकांना 2.5 लाख आणि स्मृतीचिन्ह वितरीत केलं. त्यामध्ये सर्वाधिक मुलांचा समावेश होता. आयझॉल पूर्व-2 मतदारसंघात सर्वात जास्त मुलांचा जन्म झाल्याचा त्यांनी दावा केलाय. दरम्यान, रोयटेंनी 17 पालकांचा सन्मानही यावेळी केला.

स्थानिक पातळीवर 'आरआरआर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रॉयटे यांनी जूनच्या आधी 'फादर्स डे' दिवशी, छोट्या मिझो समुदायांमध्ये लोकसंख्या वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या मतदारसंघात सर्वाधिक मुलं असलेल्या पालकांना 1 लाखाचं बक्षीस देण्याची घोषणा केली होती. दरम्यान, त्यांनी मंगळवारी 1 लाखाचे पहिले बक्षीस तुईथीयांग परिसरातील विधवा महिला नगुरौवीला (Ngurouwi) पुरस्कार म्हणून देण्यात आलं. तिला एकूण 15 मुलं असून त्यात सात मुलांचा समावेश आहे. तर छिंगा वेंग येथील रहिवासी असलेल्या लियानथांगी या आणखी एका महिलेला 30,000 रुपयांचं दुसरं बक्षीस देण्यात आलं. लियानथांगीला 13 मुलं आहेत.

हेही वाचा: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दारु पिऊन 10 टक्के लाच घेतात

प्रत्येकी 12 मुलं असलेल्या दोन महिला आणि एका पुरुषाला 20 हजारांचं बक्षीस देण्यात आलंय. याशिवाय, आठ मुलांसह 12 पालकांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचं बक्षीस देण्यात आलं. रोयटे यांनी पीटीआयला सांगितलं, की मिझो समुदायातील घटती लोकसंख्या ही एक गंभीर समस्या आहे. जनगणनेच्या आकडेवारीनुसार, 2011 मध्ये राज्याची लोकसंख्या 10.97 लाख होती, जी 2001 च्या लोकसंख्येपेक्षा 23.48 टक्के अधिक होती. तर 1971-1981 दरम्यान मिझोरमची लोकसंख्या वेगाने वाढली, तेव्हा लोकसंख्या 48.55 टक्के इतकी होती. हे लक्षात घेता, आसाम आणि उत्तर प्रदेशसारख्या राज्यांत वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी दोन मूलं धोरण लागू आहे. रोयटे म्हणाले, मिझोराममध्ये लोकसंख्येची घनता 52 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर आहे आणि राष्ट्रीय सरासरी साध्य करण्यासाठी ती किमान 94 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर असावी, असा त्यांचा दावा आहे. मिझोराममध्ये 87 टक्के लोकसंख्या ही मिझो जमातींची आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

हेही वाचा: VIDEO : खासदार प्रज्ञा ठाकुरांचा महिला खेळाडूंसोबत 'कबड्डीचा डाव'

loading image
go to top