चिक्कोडीचे माजी आमदार दत्तू हक्‍क्‍यागोळ अपघातात ठार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

संकेश्‍वर - चिक्कोडी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार दत्तू यल्लाप्पा हक्‍यागोळ (वय 77) आज दुपारी अपघातामध्ये ठार झाले. मसोबा हिटणी फाट्याजवळ राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना त्यांच्या दुचाकीला भरधाव ट्रकने जोराची धडक दिली. त्यात ते जागीच झार झाले.

याबाबत संकेश्‍वर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. हक्‍यागोळ यांचे सहकारी सुभाष इराप्पा गडकरी (वय 50) हे जखमी असून त्यांना उपचारासाठी बेळगाव जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, माजी आमदार दत्तू हक्‍यागोळ व सुरेश बडीगेर हे दुचाकीने मसोबा हिटणीकडे निघाले होते. महामार्ग ओलांडताना बेळगावच्या दिशेने चाललेल्या ट्रकची (केए 23, ए 7074) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक  बसली. या धडकेत हक्‍यागोळ यांचा जागीच मृत्यू झाला. तर सुरेश बडिगेर हे जखमी झाले.

जुन्या चिक्कोडी मतदार संघाचे माजी आमदार असलेल्या दत्तू हक्‍यागोळ यांनी भाजपच्या तिकिटावर 2004 साली निवडणूक लढविली होती. काडापूर या खेड्यातून अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून आलेले हक्‍यागोळ विजयी झाल्याने राज्यात चर्चेचा विषय बनले होते. केंद्रीय मंत्री रमेश जिगजिनगी यांचे निकटवर्तीय म्हणून ते परिचित होते. आमदार होण्याआधी ते काडापूर जिल्हा पंचायत मतदार संघातून विजयी झाले होते.

चिक्कोडी जिल्हा मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनात ते सक्रीय सहभागी होते. जिल्हा घोषणा न झाल्यास प्रसंगी विष प्राशन करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. हक्‍यागोळ यांच्या मागे पत्नी, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. 

Web Title: MLA Dattu Hakkyagol dead in a Road accident