आमदार चॅम्पियन पुन्हा भाजपमध्ये; सहा वर्षांची हद्दपारी एका वर्षात संपली

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 24 August 2020

भाजपने सोमवारी हरिद्वार जिल्ह्यातील खानपूरचे आमदार कुंवर प्रणव सिंह चॅम्पियन यांची हद्दपारी रद्द करत त्यांना पुन्हा पक्षामध्ये घेतले आहे.

नवी दिल्ली- भाजपने सोमवारी हरिद्वार जिल्ह्यातील खानपूरचे आमदार कुंवर प्रणव सिंह चॅम्पियन यांची हद्दपारी रद्द करत त्यांना पुन्हा पक्षामध्ये घेतले आहे. उत्तराखंड भाजप प्रदेशाध्यक्ष बंशीधर भगत यांनी याची घोषणा केली आहे. चॅम्पियन यांचे स्वागत करताना ते म्हणाले आहेत की, आपल्या वागणुकीबद्दल माफी मांगितल्यानंतर त्यांची हद्दपारी रद्द करण्यात आली आहे. चॅम्पियन यांना पक्षातून काढून १३ महिने झाले आहेत. या काळात त्यांचे आचरण खूप चांगले राहिले आहे. त्यामुळे पक्षातील सदस्यांनी कोर कमिटीच्या बेठकीत त्यांना पुन्हा पक्षात घेण्याचा निर्णय घेतला आहे, असं ते म्हणाले आहेत. 

तीन दिवसांच्या उच्चांकानंतर देशात कोरोना रुग्ण घटले!

पक्षात पुन्हा घेतल्याबद्दल चॅम्पियन यांनी आनंद व्यक्त केला आहे. पक्षाच्या बाहेर राहुनही मी पक्षासाठी काम करत होतो, असं ते म्हणाले आहेत. चॅम्पियन यांनी माध्यमांसमोर येऊन आपल्या वाईट वागणुकीबद्दल माफी मागितली आहे. विशेष म्हणजे चॅम्पियन  यांच्यावर असणाऱ्या अनेक आरोपांपैकी माध्यमांशी गैरवर्तवणूक हाही आरोप आहे. 

मला त्यावेळीही खेद होता आणि आजही मी माझ्या कृतीबद्दल माफी मागतो. मला हद्दपार केल्यानंतरही मी पक्षाच्या कार्यक्रमात सक्रिय होतो आणि पक्षाच्या नीतींसाठी काम करत होतो, असं चॅम्पियन म्हणाले. वारंवार वादात अडकणारे आमदार चॅम्पियन यांना मागील वर्षी १७ जूलैला सहा वर्षांसाठी पक्षातून काढण्यात आलं होतं. चॅम्पियन यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडिओत चॅम्पियन आपल्या समर्थकांसोबत दारु पिऊन आणि हातात बंदूक घेऊन नाचताना दिसत होते. हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर भाजपने त्यांना पक्षातून हद्दपार करण्याचा निर्णय घेतला होता.

राहुल गांधींवर आरोप करणारे ट्विट घेतले मागे; कपिल सिब्बल यांचा खुलासा

यापूर्वी जून २०१९ मध्ये अनुशासनहीनता आणि नवी दिल्लीत उत्तराखंडच्या एका पत्रकाराला धमकी देण्याच्या आरोपाखाली चॅम्पियन यांना तीन महिन्यांसाठी निवंबित करण्यात आलं होतं. शिवाय पक्षाच्या कोणत्या कार्यात सामील होण्यास त्यांना मनाई केली होती. २०१६ मध्ये काँग्रेसच्या हरीश रावत सरकारविरोधात बंडखोरी करणाऱ्या ९ आमदारांपैकी चॅम्पियन एक होते. त्यानंतर त्यांनी अन्य आमदारांप्रमाणे भाजपमध्ये प्रवेश केला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mla kuwar pranav singh champion again in bjp