
उत्तराखंडला मुसळधार पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालीय. तर काही भागात भूस्खलनामुळे रस्ते बंद झाले आहेत. पावसामुळे राज्यात हाहाकार उडाला असून स्थानिक आमदार, मंत्री पूरग्रस्त भागांचे दौरे करत आहेत. आता बागेश्वर जिल्ह्यातला एक धक्कादायक व्हिडीओ समोर येत आहे. यात भरपावसात आमदार पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी गेल्याचं दिसतंय. एक ओढा पार करत असताना आमदार जोरदार पाण्याच्या प्रवाहात अडकले. तर त्यांचा सुरक्षा रक्षक पाय घसरल्यानंतर वाहून गेला.