आमदारांना आपल्याच पैशातून आयपॅड खरेदी करावा लागणार

पीटीआय
Sunday, 7 February 2021

उत्तर प्रदेशचे आगामी विधिमंडळ अधिवेशन पेपरलेस राहणार असून यासाठी योगी आदित्यनाथ सरकारने राज्यातील आमदारांना ॲपलचे आयपॅड खरेदी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आमदारांना सुरवातीला आपल्याच पैशातून आयपॅड खरेदी करावा लागणार असून  त्याचे बिल जमा केल्यानंतर सरकारकडून आयपॅडपचे पैसे दिले जाणार आहेत.

लखनौ - उत्तर प्रदेशचे आगामी विधिमंडळ अधिवेशन पेपरलेस राहणार असून यासाठी योगी आदित्यनाथ सरकारने राज्यातील आमदारांना ॲपलचे आयपॅड खरेदी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आमदारांना सुरवातीला आपल्याच पैशातून आयपॅड खरेदी करावा लागणार असून  त्याचे बिल जमा केल्यानंतर सरकारकडून आयपॅडपचे पैसे दिले जाणार आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

केंद्रातील मोदी सरकारनंतर उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ सरकार २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प पेपरलेस करण्याच्या तयारीत आहे. अर्थसंकल्पाचे स्वरूप डिजिटल असल्याने आमदारांना ॲपलचे आयपॅड खरेदी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासंदर्भात आमदारांना पत्र पाठवण्यात आले असून त्यात त्यांना ५० हजार रुपयांपर्यंत खर्च करण्याची मूभा दिली आहे.

नक्षलवाद्यांना ठेचणार नारीशक्ती; CRPF च्या कोब्रा पथकात 34 महिला

पत्रात म्हटले की, आमदारांना सुरवातीला आपल्याच पैशातून आयपॅड खरेदी करावे लागेल, मात्र नंतर बिल जमा करून सरकारकडून पैसे घेता येतील. विधानसभेबरोबरच विधान परिषदेच्या आमदारांना देखील पत्र पाठवण्यात आले आहेत. विधानसभेत ४०३ आमदार तर विधान परिषदेत १०० आमदार आहेत.

Edited By - Prashant Patil

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLAs will have to buy iPads with their own money