
कुशश्वेरस्थान बाजारासह परिसरातील १० ग्राम पंचायतीत ४ दिवसांपासून वीज नसल्याने मोबाईल चार्जिंगला अडचणी येत आहेत. त्यामुळे चार्जिंगसाठी अनेक भागात जनरेटरचा वापर करावा लागत आहे.
पाटणा - दरभंगा जिल्ह्यात पूरग्रस्त कुशेश्वरस्थानच्या पूर्व भागात वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे. परिणामी कुशश्वेरस्थान बाजारासह परिसरातील दहा ग्राम पंचायतीत चार दिवसांपासून वीज नसल्याने मोबाईल चार्जिंगला अडचणी येत आहेत. त्यामुळे चार्जिंगसाठी अनेक भागात जनरेटरचा वापर करावा लागत आहे. यासाठी शुल्क आकारले जात आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
दरभंगा जिल्ह्यात पूरामुळे अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला असून तो सुरू होण्याची चिन्हे दिसत नाहीत. विशेषत: मोबाईल चार्जिंगसाठी वीजच नसल्याचे संपर्क कसा करावा, असा प्रश्न पडत आहे. यावर नागरिकांनी मार्ग शोधला असून जनरेटरच्या मदतीने मोबाईलचे चार्जिंग केले जात आहे. एका सामान्य मोबाईल चार्ज करण्यासाठी दहा रुपये तर ॲड्राईडसाठी १५ रुपये द्यावे लागतात.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा