इंडोनेशियाच्या नागरिकांना 30 दिवसांसाठी मोफत व्हिसा : पंतप्रधान

वृत्तसंस्था
बुधवार, 30 मे 2018

''तुमच्यापैकी अनेकांनी भारत दर्शन केले नसेल. त्यामुळे मी आता तुम्हाला आमंत्रित करत आहे, की पुढील वर्षी भारतात होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी भारतात या''.

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

जकार्ता : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इंडोनेशियाच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी पंतप्रधानांनी इंडोनेशियाच्या नागरिकांना 30 दिवसांसाठी मोफत व्हिसा देण्यात येणार असल्याची घोषणा केली.

इंडोनेशियातील जकार्ता येथील 'जकार्ता कन्व्हेन्शन सेंटर'
मध्ये पंतप्रधान मोदी बोलत होते. ते म्हणाले, इंडिया हे नाव केवळ आमच्या देशाचे यमक नसून, भारत-इंडोनेशिया मैत्रीचे यमक आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी इंडोनेशियातील नागरिकांना 'न्यू इंडिया'चा (नवा भारत) अनुभव यावा, यासाठी 30 दिवसांसाठी मोफत व्हिसा देण्यात येईल, अशी घोषणा केली. ''तुमच्यापैकी अनेकांनी भारत दर्शन केले नसेल. त्यामुळे मी आता तुम्हाला आमंत्रित करत आहे, की पुढील वर्षी भारतात होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी भारतात या'', असे आमंत्रण मोदींनी इंडोनेशियातील नागरिकांना दिले.  

दरम्यान, इंडोनेशियाच्या दौऱ्यात मोदींनी, इंडोनेशिया स्वातंत्र्यता संग्रामामध्ये हुतात्मा झालेल्या 7 हजारांपेक्षा अधिक जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.

Web Title: Modi announces 30 day free visa for Indonesian citizens invites Indian diaspora for Kumbh