esakal | गुजरात दंगलः 9 तासांच्या चौकशीत मोदींनी एक कप चहाही घेतला नव्हता
sakal

बोलून बातमी शोधा

modi main.jpg

संपूर्ण चौकशीदरम्यान मोदी हे अत्यंत शांत आणि संयमी दिसले. कोणतेही प्रश्न त्यांनी टाळले नाहीत.

गुजरात दंगलः 9 तासांच्या चौकशीत मोदींनी एक कप चहाही घेतला नव्हता

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली- वर्ष 2002 मध्ये झालेल्या गुजरात दंगलीच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या एसआयटीचे प्रमुख आर के राघवन यांच्या पुस्तकात अनेक नवीन गोष्टींचा उलगडा झाला आहे. गुजरात दंगलीप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची तब्बल नऊ तास दीर्घ चौकशी करण्यात आली होती. या संपूर्ण चौकशीत मोदी हे शांत आणि संयमी होते आणि त्यांना विचारण्यात आलेल्या सर्व 100 प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली होती, असा दावा राघवन यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. त्याचबरोबर या चौकशीदरम्यान त्यांनी एक कप चहाही घेतला नव्हता, असेही पुस्तकात नमूद करण्यात आले आहे. राघवन यांनी 'ए रोड वेल ट्रॅव्हल्ड' या आपल्या आत्मचरित्रात या सर्व गोष्टींचा उलगडा केला आहे. मोदींना चौकशीसाठी गांधीनगर येथील एसआयटी कार्यालयात बोलावण्यात आले होते. चौकशीसाठी ते सहज तयार झाले आणि येताना आपल्याबरोबर पाण्याची बाटलीही स्वतः घेऊन आल्याचे राघवन यांनी म्हटले आहे. 

राघवन यांनी लिहिलेल्यापुस्तकात या दंगलीच्या चौकशीदरम्यानच्या अनेक घटनांचा उल्लेख आहे. गुजरात दंगलीच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने गठीत केलेल्या एसआयटीच्या प्रमुखपदी राघवन यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यापूर्वी राघवन यांनी सीबीआयचे प्रमुख म्हणून काम पाहिले होते. ते बोफोर्स घोटाळा, 2000 मधील दक्षिण आफ्रिका क्रिकेट-मॅच फिक्सिंग प्रकरण आणि चारा घोटाळ्याच्या चौकशी प्रकरणाशी जोडले गेले होते. 

हेही वाचा- स्पेनमध्ये रात्रीच्या संचारबंदीचा आदेश लागू

राघवन यांनी आपल्या पुस्तकात गुजरात दंगलीप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री मोदी यांच्या चौकशीदरम्यानचा उल्लेख केला आहे. त्यांनी पुस्तकात लिहिले की, आम्ही त्यांच्या कार्यालयाला कळवले होते की, चौकशीसाठी त्यांना (मोदी) स्वतः एसआयटी कार्यालयात यावे लागेल. त्यांनी आमच्या भावना समजून घेतली आणि ते गांधीनगरला एसआयटीच्या कार्यालयात आले. 

रात्री उशिरा संपली चौकशी

मोदी यांची सुमारे नऊ तास चौकशी झाली. रात्री उशिरा चौकशीचे सत्र संपले. संपूर्ण चौकशीदरम्यान मोदी हे अत्यंत शांत आणि संयमी दिसले. कोणतेही प्रश्न त्यांनी टाळले नाहीत. आम्ही त्यांना दुपारच्या जेवणासाठी ब्रेक घ्यायचा आहे का, असेही विचारले. परंतु, तो त्यांनी नम्रपणे नकार दिला. त्यांनी स्वतःसाठी पाणी ही बरोबर आणले होते. चौकशीदरम्यान त्यांनी एक कप चहाही घेतला नाही, असे म्हणत राघवन यांनी मोदींमध्ये प्रचंड ऊर्जा असल्याचे म्हटले. 

हेही वाचा- Single parent साठी मोदी सरकारची मोठी घोषणा; सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी 'गिफ्ट'

एसआयटीने फेब्रुवारी 2012 मध्ये एक क्लोजर रिपोर्ट दिला. यामध्ये मोदी आणि इतर 63 जणांना क्लीन चिट दिली होती. यामध्ये अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश होता. त्यांच्याविरोधात कोणताच कायदेशीर पुरावा नव्हता असे राघवन यांनी सांगितले.