मोदींच्या भेटवस्तूंचा ऑनलाइन लिलाव

पीटीआय
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विविध देश-विदेशांतील दौऱ्यादरम्यान 2700 हून मौल्यवान भेटवस्तू मिळाल्या असून, त्याचा ऑनलाइन लिलाव केला जाणार आहे. सांस्कृतिकमंत्री प्रल्हाद पटेल यांनी पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव 14 सप्टेंबरपासून सुरू होईल असे सांगितले.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विविध देश-विदेशांतील दौऱ्यादरम्यान 2700 हून मौल्यवान भेटवस्तू मिळाल्या असून, त्याचा ऑनलाइन लिलाव केला जाणार आहे. सांस्कृतिकमंत्री प्रल्हाद पटेल यांनी पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव 14 सप्टेंबरपासून सुरू होईल असे सांगितले.

पंतप्रधानांना देशात आणि परदेशांतील दौऱ्यादरम्यान एकूण 2 हजार 772 भेट वस्तू मिळाल्या आहेत. त्याचा ऑनलाइन लिलाव केला जाणार आहे. या भेटवस्तूंची किमान बोली 200 रुपये, तर कमाल बोली अडीच लाख रुपये असणार आहे. या वर्षी जानेवारीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या 1800 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव करून त्याची विक्री करण्यात आली.

जानेवारीत पंधरा दिवस चाललेल्या लिलावात सर्व भेटवस्तू विकल्या गेल्या होत्या. लिलावातून मिळणारी रक्कम केंद्र सरकारच्या स्वच्छ गंगा अभियानांतर्गत नमामि गंगे योजनेसाठी खर्च करण्यात येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Modi Gifts Online Auction