"'वर्ल्ड रेकॉर्ड'साठीच मोदी सरकारकडून लसींची साठेबाजी?"

एकामागून एक ट्विट करत साधला सरकारवर निशाणा
P-Chidambaram
P-Chidambaram

नवी दिल्ली : देशातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनाही आता केंद्र सरकारच लस देणार, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच केली होती. त्यानंतर आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुहुर्तावर २१ जूनपासून या लसीकरण कार्यक्रमाला सुरुवात झाली. तसेच या दिवशी सरकारनं लसीकरणाचा जागतिक विक्रम केल्याचं जाहीरही करण्यात आलं. मात्र, आता यावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठीच सरकारनं लसींची साठेबाजी केली होती का? असा सवाल त्यांनी केला आहे.

"रविवारी लसींची साठेबाजी त्यानंतर सोमवारी लसीकरण त्यानंतर मंगळवारी पुन्हा ये रे माझ्या मागल्या हेच एक दिवसाच्या लसीकरणाच्या वर्ल्ड रेकॉर्डमागील रहस्य आहे का?" असा सवाल पी. चिदंबरम यांनी विचारला आहे. मोदी सरकारच्या या कल्पनेला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येच स्थान मिळायला हवं असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

P-Chidambaram
युगांडाच्या 'नरबळी विरोधी कायद्या'चं महाराष्ट्र कनेक्शन माहितीय का?

एवढ्यावरच चिदंबरम थांबले नाहीत तर "कोणाला ठाऊक मोदी सरकारला वैद्यकशास्त्रातला नोबेल पुरस्कारही मिळू शकेल. त्यामुळे 'मोदी है, तो मुमकीन है' असं म्हणण्याऐवजी आता 'मोदी है तो चमत्कार है'" असं वाचायला हवं, असंही चिदंबरम यांनी म्हटलं आहे.

सुप्रीम कोर्टानं केंद्राला झापलं

लस पुरवठा होत नसल्याने राज्यांकडे सोपवलेल्या १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण कार्यक्रमात अनेक अडचणी येत होत्या. दुसरीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं होतं. या परिस्थितीवर भाष्य करताना सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारकडे लसीकरण मोहिमेतील संपूर्ण तपशील मागवला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना आता १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकारचं घेईल, अशी घोषणाच केली. तसेच २१ जूनपासून या वयोगटातील सर्वांसाठी मोफत लसीकरण सुरु होईल असं जाहीर करण्यात आलं.

लसीकरणाचा जागतीक विक्रम

दरम्यान, सोमवारी २१ जून रोजी देशात ८८ लाखांहून अधिक जणांचं लसीकरण पार पडलं. हे रेकॉर्डब्रेक लसीकरण होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी ५४ लाख २४ हजार ३७४ जणांचं लसीकरण झाल्याचं सरकारनं जाहीर केलं. नेमकी हीच आकडेवारी पुढे करत पी. चिदंबरम यांनी देशातील लसीकरण मोहिमेवर संशय व्यक्त करत मोदी सरकारवर निशाणा साधला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com