narendra modi
narendra modi

राणे, शिंदेसह 43 मंत्र्यांनी पदभार स्वीकारला; पाहा फोटो

Summary

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा बुधवारी विस्तार झाला. 2019 मध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. यावेळी 43 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा बुधवारी विस्तार झाला. 2019 मध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. यावेळी 43 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यात 15 कॅबिनेट व 28 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. गुरुवारी 43 नेत्यांनी आपल्या मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. महाराष्ट्रातून नारायण राणे, भागवत कराड, भारती पवार आणि कपिल पाटील या नेत्यांनी आज पदभार स्वीकारला. याशिवाय आरोग्यमंत्री म्हणून मनसुख मंडाविया, माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, सहकार मंत्री अमित शहा, वस्त्रोउद्योग मंत्री पियुष गोयल यांच्यासह इतर नेत्यांनी पदभार स्वीकारला आहे. (modi government expansion 2021 leaders takes charge today)

कोरोना संसर्गाच्या (Corona Infection) हाताळणीतील अपयश, शेतकरी आंदोलनावर समाधानकारक तोडगा काढता न येणे, पश्चिम बंगालमध्ये मोठी हवा करूनही पदरात पडलेला पराभव आणि जुने मित्रपक्ष सोडून गेल्यामुळे भाजपबद्दलचा (BJP) वाढलेला अविश्वास या साऱ्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) दुसऱ्या सत्ताकाळातील मंत्रिमंडळ (Mantrimandal) फेरबदलातून नवी समीकरणे साधण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. शिवाय, तरुण मंत्र्यांना बढती आणि ११ महिलांना मंत्रिपदाची (Women Minister) संधी यातून नव्या मतदारांमध्ये संदेश देण्याचा प्रयत्न झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com