पुण्यातील गुडलक कॅफे पाठोपाठ "वैशाली" वर सुद्धा हातोडा
पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर असलेल्या प्रसिद्ध वैशाली रेस्टॉरंट वर महापालिकेची कारवाई
वैशाली रेस्टॉरंटचा बाहेरील परिसर अनधिकृत असल्याने पालिकेनं चालवला जे सी बी
कारवाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
आज पुण्यात महापालिकेच्या वतीने फर्ग्युसन रस्ता, जे एम रस्ता आणि डेक्कन परिसरात असणाऱ्या अनेक दुकानांवर कारवाई केली
संध्याकाळी सुरू झालेल्या या कारवाईत गुडलक कॅफे यासह इतर आस्थापना ज्या अनधिकृतपणे किंवा नियमबाह्य तयार केलेल्या आहेत अशा आस्थापनांवर कारवाईचा बडगा