Supreme Court to Review CEC Legal Immunity Law
esakal
Supreme Court agrees to examine validity of law granting lifetime legal immunity to CEC : मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर आयुक्तांना निवृत्तीनंतर कायदेशीर संरक्षण देणारा कायदा संसदेत पारित करण्यात आला होता. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर या कायद्याची समीक्षा करावी अशी मागणी करणारी याचिकाही सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना आता न्यायालयाने ही मागणी मान्य केली आहे. या कायद्याची समीक्षा करण्यास न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चाही सुरु झाल्या आहेत.