Indian Army : मोदी सरकार लष्करातील ब्रिटिश गुलामगिरी संपवणार; आता रेजिमेंटचं नाव, गणवेश बदलणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Army

देशातील गुलामगिरीच्या खुणा नष्ट करण्यासाठी मोदी सरकार रस्त्यांची आणि इमारतींची नावं बदलत आहे.

Indian Army : मोदी सरकार लष्करातील ब्रिटिश गुलामगिरी संपवणार; आता रेजिमेंटचं नाव, गणवेश बदलणार

नवी दिल्ली : देशातील गुलामगिरीच्या खुणा नष्ट करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार (Modi Government) रस्त्यांची आणि इमारतींची नावं बदलत आहे. अलीकडंच सरकारनं राजपथचं नाव बदलून 'कर्तव्य पथ' केलं. याशिवाय, मोदी सरकारनं नौदलाचा जुना ध्वजही रद्द केला. जुन्या नौदलाच्या ध्वजावर किंग जॉर्ज क्रॉसचं चिन्ह होतं. आता हा ध्वज नौदल म्हणून ओळखला जाणार आहे.

मोदींचा गुलामीच्या सर्व खुणा पुसून टाकण्याचा मानस

त्याच वेळी, केंद्र सरकारच्या सूचनेनुसार आता भारतीय लष्करातील वसाहती प्रथा, युनिट्स आणि रेजिमेंटची नावं रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झालीय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्देशानुसार, जनरल मनोज पांडे (General Manoj Pandey) यांच्या नेतृत्वाखालील भारतीय सैन्यानं (Indian Army) वसाहती प्रथा आणि दलातील युनिट्स आणि रेजिमेंटची नावं काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. 15 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून गुलामीच्या सर्व खुणा पुसून टाकण्याचा मानस व्यक्त केला होता. त्या अनुषंगानं लष्करातील ब्रिटिश वसाहतवादी नावं, प्रथा, परंपरा अन्य अनेक अशा गोष्टी ज्यांना गुलामीच्या खुणा म्हणू शकतो ते काढून टाकण्यात येणार आहे.

हेही वाचा: Muslim Couples : वाह.. क्या बात है! मुस्लिम दाम्पत्यानं हिंदू मंदिराला दान केली 'इतकी' मोठी रक्कम

कुचकामी प्रथांपासून दूर जाणं आवश्यक

लष्कराच्या दस्तऐवजात म्हटलंय की, 'काही वारसा प्रथा ज्यांचं पुनरावलोकन आवश्यक आहे जसं की वसाहतवादी आणि पूर्व-वसाहत काळातील प्रथा आणि परंपरा, सैन्याचा गणवेश आणि वेशभूषा, नियम, कायदे, नियम, धोरणे, युनिट स्थापना, वसाहती भूतकाळातील संस्था, काही युनिट्सची इंग्रजी नावं, इमारती, आस्थापना, रस्ते, उद्यानं, ऑचिनलेक किंवा किचनर हाऊस सारख्या संस्थेचं नाव बदलणं.' लष्कराच्या मुख्यालयातील एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, 'ब्रिटिश वसाहतवादी वारसा दूर करताना पुरातन आणि कुचकामी प्रथांपासून दूर जाणं आवश्यक आहे. पंतप्रधानांनी लोकांना पाळण्यास सांगितलेल्या पाच प्रतिज्ञांच्या अनुषंगानं राष्ट्रीय भावनांशी जुळवून घेण्यासाठी भारतीय सैन्यानं या वारसा पद्धतींचं पुनरावलोकन करणं देखील आवश्यक आहे.'

हेही वाचा: आमचा एकही आमदार नाराज नाही, उलट राष्ट्रवादीची मंडळी शिंदे गटाच्या संपर्कात; देसाईंचा गौप्यस्फोट

'या' रेजिमेंटची नावं बदलण्यात येणार

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय लष्कराच्या खांद्याभोवती दोरी लावण्याचाही विचार केला जात आहे. याशिवाय, रेजिमेंटच्या नामांतराचाही विचार केला जात आहे. ज्या रेजिमेंटची नावं बदलल्याचा दावा केला जात आहे, त्यात शीख, गोरखा, जाट, पंजाब, डोगरा, राजपूत आणि आसाम या इन्फंट्री रेजिमेंटची नावं आहेत. या रेजिमेंट्सची नावं बदलण्यात येणार आहेत. कारण, त्यांची नावं ब्रिटिशांच्या रेकॉर्डनुसार ठेवण्यात आली आहेत.

Web Title: Modi Government Will Change Army Uniform And Regiments Name General Manoj Pandey

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..