
चेन्नईतील एका मुस्लिम जोडप्यानं हिंदू मंदिराला मोठी देणगी दिली आहे.
Muslim Couples : वाह.. क्या बात है! मुस्लिम दाम्पत्यानं हिंदू मंदिराला दान केली 'इतकी' मोठी रक्कम
चेन्नई : तामिळनाडूची (Tamil Nadu) राजधानी असलेल्या चेन्नईत एका मुस्लिम जोडप्यानं (Muslim Couples) हिंदू मंदिराला 1 कोटी रुपयांची देणगी दिलीय, त्यामुळं या जोडप्याची जोरदार चर्चा सुरू आहे. चेन्नईतील दाम्पत्य सुबिना बानू आणि अब्दुल गनी यांनी मंगळवारी तिरुमला तिरुपती देवस्थानला (Tirupati Temple) 1 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. दाम्पत्याच्या या दानधर्माचं सर्वत्र कौतुक होत आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेनं दाम्पत्याचे फोटोही प्रसिद्ध केलं आहेत. या मुस्लिम जोडप्यानं दान केलेल्या वस्तूंमध्ये फर्निचर, नुकत्याच बांधलेल्या पद्मावती विश्रामगृहासाठी 87 लाखांची भांडी आणि अन्नप्रसादम ट्रस्टसाठी 15 लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्ट (डीडी) यांचा समावेश आहे. या जोडप्यानं तिरुमला मंदिरातील टीटीडीचे कार्यकारी अधिकारी एव्ही धर्मा रेड्डी यांच्याकडं हा धनादेश सुपूर्द केला.
उद्योगपती अब्दुल गनी यांनी हिंदू मंदिराला दान देण्याची ही पहिली वेळ नाहीय. यापूर्वी त्यांनी बालाजी मंदिरालाही देणगी दिली आहे. सन 2020 मध्ये गनींनी कोरोना महामारीच्या काळात मंदिर परिसरात जंतुनाशक फवारण्यासाठी ट्रॅक्टर-माउंट स्प्रेअर दान केलं. तसेच त्यांनी भाजीपाला वाहतूक करण्यासाठी 35 लाखांचा रेफ्रिजरेटर ट्रक मंदिराला दान केला होता.