Sonia Gandhi : केंद्र सरकारचा सोनिया गांधींना मोठा धक्का; राजीव गांधी फाउंडेशनचे लायसन्स रद्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sonia Gandhi : केंद्र सरकारचा सोनिया गांधींना मोठा धक्का; राजीव गांधी फाउंडेशनचे लायसन्स रद्द

Sonia Gandhi : केंद्र सरकारचा सोनिया गांधींना मोठा धक्का; राजीव गांधी फाउंडेशनचे लायसन्स रद्द

केंद्र सरकारने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.. राजीव गांधी फाउंडेशनचे परदेशातून फंड घेण्याचे लायसन रद्द केले आहे. परदेशी योगदान (नियमन) कायद्यांतर्गत गृह मंत्रालयाने राजीव गांधी फाउंडेशनचा परवाना रद्द केला आहे. राजीव गांधी फाउंडेशनवर विदेशी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. (Modi govt cancels FCRA licence of Rajiv Gandhi Foundation and Rajiv Gandhi Charitable Trust )

राजीव गांधी फाउंडेशन (RGF) ही गांधी कुटुंबाशी संबंधित संस्था आहे. फाउंडेशनवर विदेशी निधी कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्याचे समोर आले. गृह मंत्रालयाच्या चौकशी समितीच्या अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जुलै 2020 मध्ये गृह मंत्रालयाने ही चौकशी समिती स्थापन केली होती.

माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या RGF च्या अध्यक्षा आहेत तर इतर विश्वस्तांमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी अर्थमंत्री पी चिदंबरम, काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फाउंडेशनची स्थापना 1991 मध्ये झाली, RGF आरोग्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान, महिला आणि मुले, दिव्यांगांना आधार यासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर काम करते. 1991 ते 2009 या काळात फाऊंडेशनने शिक्षणाच्या विकासावर भर दिला होता. अशी माहिती फाउंडेशनच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे.

टॅग्स :Sonia GandhiRajiv Gandhi