एप्रिल महिन्यापासून हातात कमी येणार सॅलरी; सरकार बदलू शकते कामाचे तास आणि PFचे नियम

सकाळ वृत्तसेवा
Monday, 8 February 2021

1 एप्रिल 2021 पासून आपल्या ग्रॅज्यूएटी, पीएफ आणि कामाच्या तासांमध्ये मोठा बदल पहायला मिळू शकतो.

नवी दिल्ली : 1 एप्रिल 2021 पासून आपल्या ग्रॅज्यूएटी, पीएफ आणि कामाच्या तासांमध्ये मोठा बदल पहायला मिळू शकतो. कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्यूएटी आणि पीएफमध्ये वाढ होईल. तर, हातात येणारा पैसा म्हणजे टेक होम सॅलरी कमी होईल. इतकंच नव्हे तर कंपन्यांच्या बॅलन्स शीटवर देखील याचा परिणाम होईल. याचं कारण आहे गेल्या वर्षी संसदेत पारित केले गेलेले तीन कामगार विधेयकं. ही विधेयकं या वर्षी 1 एप्रिलपासून लागू होण्याची शक्यता आहे. 

वेतनाच्या नव्या परिभाषेनुसार, भत्ते एकूण सॅलरीच्या जास्तीतजास्त 50 टक्के असतील. याचाच अर्थ की, एप्रिलपासून मूळ वेतन एकूण वेतनाच्या 50 टक्के किंवा अधिक असायला हवेत. देशाच्या स्वातंत्र्यांनंतर गेल्या 73 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कामगार कायद्यांत याप्रकारे बदल केले जात आहेत. सरकारचं म्हणणं आहे की हे कंपन्यांसाठी तसेच कामगारांसाठीही फायदेशीर ठरेल. 

हेही वाचा - सचिनसह सगळ्यांच्या ट्विट्सची महाराष्ट्र सरकार करणार चौकशी; तपासणार भाजप कनेक्शन

कामाचे 12 तास बदलण्याचा प्रस्ताव
नव्या ड्राफ्ट कायद्यामध्ये कामकाजाचे जास्तीतजास्त तास वाढवून 12 तास करण्याचा प्रस्ताव सादर केला गेला आहे. ओएसएच कोडच्या ड्राफ्ट नियमांमध्ये देखील 15 ते 30 मिनिटांच्या आतील कामकाजाला देखील 30 मिनिट गृहीत धरुन ओव्हरटाइममध्ये समाविष्ट करण्याची तरतूद आहे. सध्याच्या नियमानुसार, 30 मिनिटांहून कमी वेळेला ओव्हरटाइम मानलं जाणार नाही. ड्राफ्ट नियमांमध्ये  कोणत्याही कर्मचाऱ्याकडून 5 तासांहून अधिक सलग काम करवून घेण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांना दर पाच तासांनंतर अर्धा तास विश्रांती देण्याचे निर्देश देखील या ड्राफ्टच्या नियमांमध्ये समाविष्ट आहे. 

म्हणूनच वेतन घटेल आणि पीएफ वाढेल
नव्या ड्राफ्ट रुलनुसार, मूळ वेतन एकूण वेतनाच्या 50 टक्के वा त्याहून अधिक असायला हवे. यामुळे अधिकतर कर्माचाऱ्यांची वेतन संरचना बदलेल. कारण वेतनातील गैरभत्त्यांचा भाग हा सामान्यत: सॅलरीच्या 50 टक्क्यांहून कमी असतो. तर एकूण वेतनामध्ये भत्त्यांचा भाग आणखी अधिक होतो. मूळ वेतन वाढल्याने आपले पीएफ देखील वाढेल. याचा अर्थ आहे की टेक-होम अर्थात हातात येणाऱ्या वेतनामध्ये घट होईल. 

रिटायरमेंटच्या पैशात होईल वाढ
ग्रॅज्यूएटी आणि पीएफमध्ये वाढ झाल्याने रिटायरमेंटनंतर मिळणाऱ्या पैशांमध्ये देखील वाढ होईल. यामुळे लोकांचे रिटायरमेंटनंतरचे आयुष्य सुखद होईल. यामुळे कंपन्यांना देखील भुर्दंड बसू शकतो. कारण त्यांना देखील वाढलेल्या पीएफमध्ये वाढीव योगदान द्यावं लागेल. यामुळे कंपनीची बॅलन्स शीट प्रभावित होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: modi govt in hand salary will decrease from 1st april working hours overtime pf retirement salary will change