Chandrayaan: 23 ऑगस्ट यापुढे राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा होणार, मोदींची मोठी घोषणा

Chandrayaan: चंद्रयान-3 मोहिमेतील महिला वैज्ञानिकांच्या योगदानाचे पंतप्रधान मोदींनी कौतुक केले.
Modi ISRO Visit updates India To Observe August 23 As National Space Day To Celebrate Chandrayaan-3's Success
Modi ISRO Visit updates India To Observe August 23 As National Space Day To Celebrate Chandrayaan-3's Success Sakal
Updated on

Chandrayaan: चांद्रयान 3 मोहिमेत सहभागी शास्त्रज्ञांना भेटण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बेंगळुरू येथील इस्रोच्या (ISRO) कमांड नेटवर्क मिशन कंट्रोल कॉम्प्लेक्समध्ये पोहोचले. चांद्रयान-3 चे चंद्रावर यशस्वी लँडिंग केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रो टीमच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.

त्यांचे शरीर आणि मन आनंदाने भरून गेले असल्याचे त्यांनी सांगितले. पीएम मोदींनी घोषणा केली की, दरवर्षी 23 ऑगस्ट हा दिवस 'राष्ट्रीय अंतराळ दिवस' म्हणून साजरा केला जाईल.

इस्रोच्या वैज्ञानिकांशी संवाद साधताना पीएम मोदी म्हणाले, 23 ऑगस्टचा तो दिवस माझ्या डोळ्यांसमोर प्रत्येक सेकंदाला पुन्हा पुन्हा फिरत आहे.

23 ऑगस्ट रोजी 'राष्ट्रीय अंतराळ दिन' साजरा करण्याची घोषणा

23 ऑगस्टला भारताने चंद्रावर तिरंगा फडकावला, तो दिवस आता 'राष्ट्रीय अंतराळ दिन' म्हणून साजरा केला जाईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज संपूर्ण जगाने आपल्या शास्त्रज्ञांचे आणि वैज्ञानिक प्रतिभेचे कौतुक केले आहे. चांद्रयान-3 मोहिमेतील महिला वैज्ञानिकांच्या योगदानाचे पंतप्रधान मोदींनी कौतुक केले.

Modi ISRO Visit updates India To Observe August 23 As National Space Day To Celebrate Chandrayaan-3's Success
Marathi News Updates: अजित पवारांची बारामतीत सभा ते राज्यातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

लँडर ज्या ठिकाणी उतरेल त्याला 'शिवशक्ती पॉइंट' असे म्हटले जाईल.

चंद्रावरील विक्रम लँडर ज्या ठिकाणी उतरले त्या ठिकाणाचे नामकरणही पंतप्रधान मोदींनी जाहीर केले. मून लँडर ज्या ठिकाणी चंद्रावर उतरले ते ठिकाण 'शिवशक्ती पॉइंट' म्हणून ओळखले जाईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

ते म्हणाले की, मानवतेच्या कल्याणाचा संकल्प शिवामध्ये आहे आणि तो संकल्प पूर्ण करण्याची क्षमता शक्तीने आपल्याला मिळते.

यासोबतच पीएम मोदींनी चंद्राच्या पृष्ठभागावरील त्या ठिकाणाचे नाव देखील दिले जेथे चांद्रयान-2 चे हार्ड लँडिंग झाले. चंद्रावरील ज्या जागेवर चांद्रयान-2 ने पाऊल टाकले आहे, त्या जागेला आता तिरंगा पॉइंट म्हटले जाईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

Modi ISRO Visit updates India To Observe August 23 As National Space Day To Celebrate Chandrayaan-3's Success
Chandrayaan-3: 615 कोटींच्या चांद्रयानातून 31 हजार कोटींची कमाई, कोणी भरली एवढी तिजोरी?

'आम्ही जिथे पोहोचलो तिथे कोणीच पोहोचले नाही'

पीएम मोदी म्हणाले, जिथे कोणी पोहोचले नव्हते तिथे आम्ही पोहोचलो. आम्ही ते केले जे यापूर्वी कोणी केले नाही. पीएम मोदी म्हणाले, 'एक काळ असा होता जेव्हा आमची गणना तिसऱ्या रांगेत होत होती.

आज व्यापारापासून तंत्रज्ञानापर्यंत भारताची गणना पहिल्या रांगेत उभ्या असलेल्या देशांमध्ये होत आहे. तिसऱ्या रांगेतून पहिल्या रांगेपर्यंतच्या या प्रवासात आपल्या इस्रोसारख्या संस्थांचा मोठा वाटा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com