PM Narendra Modi
sakal
देश
PM Narendra Modi: ‘जननायक’ किताब चोरीचा प्रयत्न; पंतप्रधान मोदींचा टोला, बिहारमध्येही अनेक योजनांचा प्रारंभ
Bihar Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारमध्ये नवीन कौशल्य विद्यापीठ, आयटीआय सुधारणा व युवक रोजगार योजनेचे उद्घाटन केले. मोदींनी विरोधकांना लक्ष्य करत जननायक कर्पूरी ठाकूर यांच्या नावावरील पुस्तक चोरीच्या प्रकरणाचा टोला लगावला.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कौशल्य दीक्षांत समारंभात तरुणांशी संबंधित ६२ हजार कोटी रुपयांहून अधिकच्या योजनांचे उद््घाटन करताना विरोधकांना लक्ष्य केले. ‘नव्या कौशल्य विद्यापीठाचे नाव जननायक कर्पूरी ठाकूर यांच्या नावावर आहे. बिहारच्या लोकांनी सावध राहण्याची गरज आहे. आजकाल काही लोक जननायक किताबही चोरी करण्यामध्ये गुंतले आहेत,’ असा हल्ला पंतप्रधान मोदींनी केला.