मोदींने घेतले मुक्तिनाथाचे दर्शन; वाजविले पारंपारिक वाद्य

वृत्तसंस्था
शनिवार, 12 मे 2018

नेपाळ दौऱ्याच्या दूसऱ्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुक्तिनाथ मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंदिराचे पारंपरिक वाद्य देखील वाजवले.

नवी दिल्ली : नेपाळ दौऱ्याच्या दूसऱ्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुक्तिनाथ मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंदिराचे पारंपरिक वाद्य देखील वाजवले. नरेंद्र मोदी यांनी जोजीला येथील बोगद्याच्या रस्ता प्रकल्पाची पायाबांधणी सुरू केली असून 19 मे पासुन कामास सुरवात होणार आहे. 

या प्रकल्पामुळे सीमा भागाजवळील महत्त्वपूर्ण असा काश्मिर खोरे ते लडाखकडे जाणारा रस्ता बारा महिने चालु राहील. 14.2 किमी. मार्ग बनविण्यासाठी 6809 करोड रुपये खर्च येणार आहे, तसेच हा मार्ग 2026 पर्यंत पूर्ण होईल. श्रीनगर ते लेह या मार्गावर झी-मॉर्ह येथील 6.5 किमी बोगद्याच्या रस्त्याचे काम पुढच्या वर्षी पूर्ण होण्याची शक्यता आहे. 

1997 मध्ये जोजीला येथील बोगद्याचे सर्वेक्षण भारतीय लष्कराने केले होते आणि 1999 साली कारगिल युद्धानंतर प्रत्यक्ष नियोजन सुरू करण्यात आले होते. लडाखच्या लोकांना दिलेले वचन पूर्ण करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. झी-मॉर्ह आणि जोजीला बोगद्यांमधील 20 किमी अंतराच्या कामाचा काळजीपूर्वक फेरविचार केला जाईल, असे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. 

सध्याच्या महामार्गापासून सुमारे 400 मीटर खाली बांधण्यात येणार जोजीला हा आशियातील सर्वात लांब बोगदा असाल्याचा दावा रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. "हिवाळ्यात सीमावर्ती भागातील पहारा देत असलेल्या सैनिकांपर्यंत गरजेच्या वस्तू पुरविण्यासाठी सुरक्षा दलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे हा मार्ग संपूर्ण कारगिल क्षेत्रासाठी युध्दशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण आहे.", असे गडकरी यांनी सांगितले.

सध्या 14.2 किमीच्या प्रवासासाठी तीन तास लागायचे, पण आता हो बोगदा पूर्ण झाल्यानंतर केवळ पंधरा मिनीटे लागतील. तसेच या बोगद्यात प्रतिताशी 80 किमी या वेगाने वाहने चालविता येतील, ज्यामध्ये हाय-टेक कम्युनिकेशन सिस्टीमसह आवश्यक सुरक्षा सुविधा उपलब्ध असेल. या प्रकल्पासाठी गेल्या वर्षी राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळाने आय.एल. अॅण्ड एफ. एस. या कंपनीला 4900 कोटी रुपयांचा निधी दिला आहे, अशी माहिती गडकरी यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: modi visit muktinath temple in nepal