PM Modi फक्त दोन उद्योगपतींसाठी २४ तास काम करतात: राहुल गांधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Modi फक्त दोन उद्योगपतींसाठी २४ तास काम करतात: राहुल गांधी

PM Modi फक्त दोन उद्योगपतींसाठी २४ तास काम करतात: राहुल गांधी

महागाई जीवनावश्यक वस्तूंवरची जीएसटी आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे. 7 सप्टेंबरपासून 'भारत जोडो यात्रा' सुरू होण्याआधी महागाई ते बेरोजगारी आणि जीएसटीच्या मुद्द्यावरून भाजपविरोधात काँग्रेस रामलीला मैदानावर आंदोलन चालू आहे. यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी बेरोजगारी आणि महागाई या दोन विषयावर केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

रामलीला मैदानावर राहुल गांधी यांनी केंद्र सरकार मोदी बोलताना म्हणाले की, देशातील बेरोजगारी, देशातील महागाई आणि देशाची संपूर्ण संपत्ती दोन उद्योगपतींच्या हातात आहे. हे दोन उद्योगपती नरेंद्र मोदींसाठी 24 तास काम करतात. नरेंद्र मोदीही या दोन उद्योगपतींसाठी 24 तास काम करतात. नरेंद्र मोदीजी पंतप्रधान आहेत, पण त्या दोन उद्योगपतींशिवाय नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकत नाहीत.

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, मला हे बोलणे आवडत नाही, पण हा देश आपल्या तरुणांना रोजगार देऊ शकणार नाही. ते म्हणाले, दोन उद्योगपती देशाला रोजगार देऊ शकणार नाहीत. लघुउद्योग देशाला रोजगार देतात, शेतकरी देतात. मात्र मोदी सरकारने त्यांचे कंबरडे मोडले आहे.

यावेळी राहुल गांधी बोलताना म्हणाले की, देशातील सरकारी यंत्रणा दबावाखाली आहे. विरोधी पक्षांना बोलू दिलं जात नाही. देशाला रोजगार देणाऱ्यांचा कणा भाजपने मोडला आहे. मी आता ईडीला घाबरत नाही. मला चौकशीसाठी कितीही वेळा बोलवा, मी घाबरत नाही, असंही ते म्हणालेत.

'भाजप आणि आरएसएसचे नेते देशाचे विभाजन करत आहेत'

भारतात आज भीती वाढताना दिसत आहे. आज देशाचं भविष्य भीतीच्या सावटाखाली आहे. लोकांना महागाई आणि बेरोजगारीची भीती आहे. द्वेषाने देश कमकुवत होत आहे. भाजप आणि आरएसएसचे नेते देशाचे विभाजन करत आहेत आणि जाणूनबुजून देशात भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत, असा थेट आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

Web Title: Modi Works 24 Hours For Industrialists Rahul Gandhi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..