तर मोदीजी, 'तुम्ही जेलमध्ये जायला तयार रहा'- ममता बॅनर्जी

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 मे 2019

कोलकत्यात भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शो दरम्यान उसळलेल्या हिंसाचाराचं राजकारण अजुन शांत झालेलं नाही. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदींना थेट जेलमध्ये टाकण्याची धमकी दिलीय. थोर विचारवंत ईश्वरचंद्र विद्यासागर यांची मूर्ती फोडण्यात आली होती. ही मूर्ती तृणमूलच्या गुंडांनी फोडली असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता, यावरून ममतांनी मोदींना ही धमकी दिली आहे. 

नवी दिल्ली- कोलकत्यात भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शो दरम्यान उसळलेल्या हिंसाचाराचं राजकारण अजुन शांत झालेलं नाही. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदींना थेट जेलमध्ये टाकण्याची धमकी दिलीय. थोर विचारवंत ईश्वरचंद्र विद्यासागर यांची मूर्ती फोडण्यात आली होती. ही मूर्ती तृणमूलच्या गुंडांनी फोडली असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता, यावरून ममतांनी मोदींना ही धमकी दिली आहे. 

ममता म्हणाल्या की, बंगालची जनताच आता विद्यासागर यांची मूर्ती बनवून देईल. हिंसाचारात ज्या महाविद्यालयाचं नुकसान झालं ते 200 वर्ष जुनं होतं. त्याची भरपाई भाजप करून देणार आहे का? असा सवाल त्यांनी केला. ही मूर्ती तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी फोडली असेल तर ते आरोप सिद्ध करा नाही तर तुम्ही जेलमध्ये जायला तयार रहा, असा इशाराच त्यांनी मोदी आणि शहा यांना दिला आहे.

दरम्यान, कोलकत्यातल्या एका महाविद्यालयात असलेली ईश्वरचंद्र विद्यासागर यांची मूर्ती मंगळवारच्या हिंसाचारात फोडलेली आढळली होती. त्यावरून भाजप आणि तृणमूलमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. ही मूर्ती तृणमूलच्या गुंडांनी फोडली असा आरोप भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. तर ही मूर्ती भाजपच्याच कार्यकर्त्यांनी फोडली असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: modiji we will drag you to jail says Mamata Banerjee tells PM Modi